Nashik Lok Sabha constituency : नाशिक मतदारसंघात ठरलं, 'एकतर ठाकरे नाहीतर पिंगळे'

Ncp Vs Shiv sena : महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ही ठाकरे गटाकडे असण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीकडूनदेखील या मतदारसंघावर दावा सांगितला जाऊ शकतो.
uddhav thackeray, Gokul Pingle
uddhav thackeray, Gokul Pingle sarkarnama
Published on
Updated on

Nashik : लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र समोर आलेले नाही. इच्छुक सर्व बाबींचा अंदाज घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आपली भूमिका जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.

uddhav thackeray, Gokul Pingle
Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा समाजाचे सर्वेक्षण 'या' तारखेपासून होणार सुरू

महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ही ठाकरे गटाकडे असण्याची शक्यता आहे. मात्र,राष्ट्रवादीकडून (NCP) देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जावू शकतो. त्यामुळे 'एकतर ठाकरे (Thackeray) नाहीतर गोकुळ पिंगळे' असाच नारा देण्यास सुरुवात राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. जर ठाकरे गटाचा उमेदवार ठरत नसेल तर राष्ट्रवादीचे गोकुळे पिंपळे हेच आमचे उमेदवार हे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) शड्डू ठोकला असून, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाला लोकसभेच्या जागेबाबत फारच आशादायक चित्र असल्याचे दिसते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले यांनी सांगितले की, लोकसभेसाठी फारसं काही ठरवण्यासारखं नाही.

नाशिक लोकसभेची जागा अनेक निवडणुकांपासून शिवसेना (ठाकरे गट) लढवते. यावेळीसुद्धा तसेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून जो उमेदवार पुढे येईल, त्यासाठी आमचे कार्यकर्ते नेटाने प्रयत्न करतील. राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. बेरोजगारी, उपासमार, गुन्हेगारी, त्रस्त शेतकरी असे अनेक मुद्दे सत्ताधाऱ्यांच्याविरोधात आहे. त्यामुळे महाआघाडीचा विजय निश्चित आहे.

...तर पिंगळे उमेदवार

राज्यातील जागांच्या तडजोडीमध्ये हा मतदारसंघ आमच्याकडे आला तर राष्ट्रवादीकडून गोकुळ पिंगळे हे निवडणूक लढवतील, असे भोसले यांनी जाहीर केले. पिंगळे यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली असून त्यांच्याकडे अनुभव आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. एकतर ठाकरे नाही तर पिंगळे या सूत्रावर आमचे कार्यकर्ते काम करतील, असे प्रदेश सरचिटणीस भोसले यांनी स्पष्ट केले.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com