Chandrakant Patil; चंद्रकांत पाटील यांना इशारा; राज्यातील महाविद्यालयांचे शिक्षकेत्तर कर्मचारी दिला थेट इशारा!

Chandrakant Patil warned by college non teaching staff: शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटेना, आता महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा.
Chandrakant Patil facing backlash from college staff
Chandrakant Patil facing backlash from college staffSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra education department staff agitation: सध्या महाविद्यालयीन परिक्षांचा हंगा सुरू आहे. नेमकी हीच स्थिती लक्षात घेऊन कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या निमित्ताने महाविद्यलयांतील परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने सरकारचे नाक दाबण्याचा प्रयत्न होणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटी यांना यानिमित्ताने शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी इशारा दिला आहे. यासंदर्भात जळगाव येथे झालेल्या बैठकीत आपल्या मागण्यांसाठी संघटांना आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाची सुरवात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यातून होणार आहे हे विशेष.   

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ व शिक्षकेत्तर सेवक कृती समितीतर्फे शिक्षकेत्तर सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारपासून आंदोलन होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या ८ जुन पासून थेट कामबंद आंदोलन होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाला कोंडीत पकडण्यासाठी कर्मचारी सरसावले आहेत.

Chandrakant Patil facing backlash from college staff
Pune ZP News: ऐतिहासिक निर्णय! पुणे ZP शाळांमध्ये खासगी परीक्षांना बंदी; गावातच मिळणार उच्च शिक्षण

दरम्यान कर्मचा-यांनी ऐन महाविद्यालयीन परीक्षेच्या कालावधीत आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जळगांव येथे महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Chandrakant Patil facing backlash from college staff
PMC News: पुणे महापालिकेत ‘माझा प्रभाग-माझा माणूस’ पॅटर्न? कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनावरून नवा वाद

राज्यासह नाशिकमधील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सेवक त्यात सहभागी होतील. या आंदोलनावर ठाम असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विलास संगमनेरे आणि सचिव उमेश देशमुख यांनी दिली.सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये १४ ते १६ मे दरम्यान काळ्या फिती लावून काम करतील. दुपारच्या सुट्टीत धरणे, निषेध सभा हईल. त्यानंतरच्या टप्प्यात राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन होईल.

परिक्षांच्या काळातच हे आंदोलन करून संघटनेने राज्य शासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांसह प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांबाबत दिर्घकाळ पाठपुरावा करूनही शासनाचा प्रतिसाद मिळालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com