Gokul Gite : "निवडणूक 6 वर्षातून एकदा, एक संधी गेली हा गोल्डन चान्स..."; गोकुळ गीतेंनी दराडेंना सुनावलं, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Nashik MLC Election : अपक्ष गोकुळ गीते यांनी निवडणुकीत उमेदवारी कायम असणार हे जाहीर केले आहे. आमदार दराडे यांचे चिरंजीव यांनी आपला बाप काढत आव्हान दिले. त्यामुळे आपण दुखावले गेलो असा दावा त्यांनी केला आहे. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट झाले.
Narendra Darade, Gokul Gite
Nashik MLC Election | Gokul Gite | Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 05 Jun : नाशिक विधानपरिषदेची निवडणूक सतत नव्या राजकीय घडामोडींनी गाजते आहे. बंडखोरी कायम असल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. या निमित्ताने निवडणुकीत काय होईल याची चाहूल लागली आहे.

अपक्ष गोकुळ गीते यांनी निवडणुकीत उमेदवारी कायम असणार हे जाहीर केले आहे. आमदार दराडे यांचे चिरंजीव यांनी आपला बाप काढत आव्हान दिले. त्यामुळे आपण दुखावले गेलो असा दावा त्यांनी केला आहे. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट झाले.

त्यावर आमदार दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी खुलासा केला आहे. गीते यांना कोणीतरी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे. गीते यांच्याकडे असलेल्या कॉल रेकॉर्डमधील आवाज माझा नाही असा दावा त्यांनी केला होता.

Narendra Darade, Gokul Gite
Sunetra Pawar : मुलाची बिनविरोध निवड होताच तटकरे देवगिरीवर; अजितदादांच्या फोटोसमोर उभं राहिलेला फोटो ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "विश्वासाला..."

या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी काल दिवसभर माघारीसाठी जंग जंग पछाडले. या संदर्भात एका मध्यस्थाकडून गोकुळ गीते यांच्याशी आमदार दराडेंचे झालेले संभाषण आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे दराडे आणि गीते यांच्यातील राजकीय दुरावा वाढला आहे.

माघारीवर गोकुळ गीते यांनी, आमदार दराडे यांना स्पष्ट शब्दात सुनावत संभाषण खंडित केले. दराडे यांच्या घरात दोघेजण आमदार आहे. त्यामुळे आता आम्हाला संधी द्यावी. तुम्ही तरुण असल्याने माघार घ्यावी तुम्हाला भविष्यात संधी मिळेल, या दराडे यांच्या दाव्यालाही गीते यांनी खोडून काढले आहे.

Narendra Darade, Gokul Gite
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी मोठा ट्विस्ट, नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी? सुनेत्रा पवार अन् फडणवीसांच्या भेटीमुळे वेगळीच चर्चा

निवडणूक सहा वर्षातून एकदा होते. विधानसभेला आमची संधी गेली. त्यामुळे आता हा गोल्डन चान्स आहे. तो आम्ही सोडणार नाही. यंदा दराडे यांनी आमच्यासाठी माघार घ्यावी. निमित्ताने समाजात निफाड तालुक्यासाठी एक आमदार होईल. त्याबाबत आम्ही सदैव दराडे आभार फ्रेम करून प्रदर्शित करू.

पुढच्या टर्मला आम्ही कुणाल दराडे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू. यंदा दराडे यांनी माघार घ्यावी आणि आम्हाला संधी द्यावी, असे थेट शब्दात गोकुळ गीते यांनी आमदार दराडे यांना सुनावले आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक टोकाचा संघर्ष असणारी असेल याची चाहूल लागली आहे. हे संभाषण असलेला व्हिडिओ गीते यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com