Nashik NMC : स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आयुक्तांची डेडलाइन; भाजपची धावपळ, 6 जागांसाठी 400 इच्छुक, कुणाला मिळणार संधी?

Nashik NMC Swikrut Nagarsevak : स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून भाजपसह सर्वपक्षीय इच्छुकांची धावपळ उडाली आहे. विशेषत: इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपपुढे आव्हान आहे.
Manisha Khatri Nashik NMC Commissioner
Manisha Khatri Nashik NMC CommissionerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik NMC, Swikrut Nagarsevak : नाशिक महापालिकेतील गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत नगरसेवक नियुक्त प्रक्रियेला अखेर आता वेग आला आहे. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या पक्षाच्या कोट्यातील उमेदवारांची नावे शिफारस पत्रासह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांची धावपळ उडाली आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन आता ९ महिने झाले तरीही अद्याप स्वीकृत नगरसेवकांची निवड केली गेलेली नाही. त्याविरोधात कॉंग्रसचे गटनेते सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावत सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. आयुक्तांनी २१ ऑक्टोबरपर्यंत संबधित पक्षांनी आपल्या कोट्यातील उमेदवारांच्या नावे सादर करण्याची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सात दिवसांत पूर्ण करून आयुक्तांमार्फत महासभेपुढे प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर महापौरांकडून महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Manisha Khatri Nashik NMC Commissioner
Nashik NMC Politics : नाशिक महापालिकेला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? ठाकरेंचा नेता आठ महिन्यांपासून वेटींगवर

नाशिक महापालिकेत सर्वपक्षीय एकुण १२२ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक ७२, त्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेचे २६, ठाकरेंच्या शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) चार, काँग्रेसचे तीन, मनसेचा एक आणि एका अपक्षाचा समावेश आहे.या संख्याबळानुसार एकुण दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक पक्षाकडे असलेल्या नगसेवकांच्या संख्याबळानुसार या जागांचे वाटप केले जाणार असून, त्यात सर्वाधिक ६ जागा भाजपला मिळणार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला २ आणि शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळणार आहे.

Manisha Khatri Nashik NMC Commissioner
Nashik NMC Politics : नाराज राष्ट्रवादीला भाजप सत्तेत वाटा देणार, नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांचे वाटप निश्चिच

या जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः भाजपमध्ये सहा जागांसाठी तब्बल चारशे जण इच्छुक असल्याने उमेदवार निश्चित करणे हे स्थानिक नेतृत्वापुढे मोठे आव्हान बनले आहे. स्वीकृतसाठी भाजपमधून आजी-माजी शहराध्यक्षांसह आमदारपुत्रांच्या नावांचा आग्रह धरण्यात आल्याने त्यांचा विचार होतो का याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून सुमारे ३०० ते ४०० इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होणार असून, सहा नावांवर शिक्कामोर्तब करणे म्हणजे मोठी कसोटी ठरणार आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेतही दोन जागांसाठी इच्छुकांचा भरणा वाढला आहे. तर दोन जागांसाठी उद्धवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com