Nashik NMC Politics : नाराज राष्ट्रवादीला भाजप सत्तेत वाटा देणार, नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांचे वाटप निश्चिच

Nashik NMC Five Subject Committees to Be Allocated : नाशिक महापालिकेत पाच विषय समित्यांचे वाटप निश्चिच झाले असून यात भाजपकडून राष्ट्रवादीला देखील स्थान देण्यात येणार आहे.
NMC Building, Nashik
NMC Building, NashikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik NMC Politics : नाशिक महापालिकेत भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेतलं आहे. शिवसेनेला उपमहापौरपद भाजपने दिले आहे. तर सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील आता भाजपकडून सत्तेत सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांमध्ये शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील समावून घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे सांगितले जात आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापतीपद येणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन इच्छुकांना सभापतीपदापासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

निश्चित झालेल्या वाटपानुसार, शिक्षण समिती, विधी समिती आणि महिला व बालकल्याण समिती या तीन समित्यांची जबाबदारी भाजपकडे राहील. आरोग्य समितीचे सभापतिपद शिवसेनेकडे जाणार असून शहर सुधार समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात येणार आहे.

NMC Building, Nashik
Nashik NMC : नाशिकमध्ये मॉल, पेट्रोलपंप, हॉटेलमधील स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत ; महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे व्यावसायिक आस्थापनांना आवाहन

सदस्य वाटप असे...

महापौर हिमगौरी आडके यांनी सुमारे महिनाभरापूर्वी या पाचही समित्यांवरील नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. प्रत्येक समितीत ९ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वाधिक नगरसेवक संख्या भाजपची असल्याने भाजपने पाचही समित्यांवर वर्चस्व राखले आहे. नऊ सदस्यीय समित्यांवर भाजपचे प्रत्येकी पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन तर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे. विधी समितीवर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवकाला संधी देण्यात आली आहे.

सभापती निवडीसाठी ८ व ९ ऑक्टोबरला मतदान

दरम्यान, सदस्य निवड होऊन महिना उलटला तरी सभापती निवडीचा मुहुर्त लागला नव्हता. मात्र, आता निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार ८ व ९ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

NMC Building, Nashik
Maharashtra FDA : तुकाराम मुंढेंच्या रडारवर महाराष्ट्रातील 12 अधिकारी : भ्रष्ट कारभारामुळे सस्पेन्शनची टांगती तलवार

८ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजता महिला व बालकल्याण समिती आणि सायंकाळी पाच वाजता शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला शुक्रवारी सकाळी १० वाजता शहर सुधार समिती, सकाळी साडेअकरा वाजता विधी समिती, तर दुपारी एक वाजता वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार आहे.

त्यानंतर सभापतींची नावे अधिकृतपणे स्पष्ट होतील. विरोधक अल्प मतात असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून द्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com