Nashik Municipal Corporation : प्रभागाचे बंधन नाही, शहर मोकळे! स्वीकृत नगरसेवकांना ३८ लाखांचा विकास निधी

Nominated Corporators to Receive Rs 38 Lakh Development Fund : नाशिक महापालिकेतील नव्याने नियुक्त झालेल्या दहा स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी ३८ लाख रुपयांचा विकास निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, त्यांना ठरावीक प्रभागाचे बंधन नसल्याने संपूर्ण शहरात विकासकामे करण्याची मुभा मिळणार आहे.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Municipal Corporation Nominated Corporators to Receive Rs 38 Lakh Development Fund : नाशिक महापालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या दहा स्वीकृत नगरसेवकांना विकासकामांसाठी प्रत्येकी ३८ लाख रुपये मिळणार आहेत. अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदीनुसार हा निधी उपलब्ध होणार असून, स्वीकृत सदस्यांना ठरावीक प्रभाग नसल्याने शहरातील कोणत्याही भागात कामे करण्याची संधी आहे.

गेल्या आठवड्यात महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली. त्यांच्या विकास निधीबाबत सुरुवातीला संभ्रम होता. मात्र, महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वीकृत सदस्यांसाठी निधीची तरतूद असल्याने प्रत्येकी ३८ लाख रुपये खर्च करता येणार आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणे स्वीकृत सदस्यांना स्वतंत्र प्रभागाचे बंधन नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण महापालिका क्षेत्रात विकासकामे सुचविता आणि निधी खर्च करता येतो.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार महिने शिल्लक असताना स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाल्याने त्यांना मार्चअखेरपर्यंत निधी खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे, निवडून आलेल्या नगरसेवकांना मात्र, स्वीकृत सदस्यांपेक्षा तुलनेने अधिक निधी आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासन उभारणार 'ही' खास प्रणाली, एक तास आधीच अंदाज येणार

महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रभागनिहाय बांधकाम कामांसाठी चार कोटी रुपयांची तरतूद असून, त्यात रस्त्यांच्या कामांना प्राधान्य आहे. प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्रभागनिहाय ६० ते ६६ लाख रुपये, क्रीडा विषयक कामांसाठी ७५ लाख रुपये, तर समाजकल्याणाच्या कामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ३१ प्रभागांतील विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

त्याचप्रमाणे २०२५-२६ व २०२६-२७ या दोन आर्थिक वर्षांचे प्रत्येकी ३८ लाख रुपयांचा निधी निवडून आलेल्या नगरसेवकांना मिळणार आहे. यात तीस लाख रुपये प्रभाग विकास निधी व आठ लाख रुपये नगरसेवक विकास निधी असे विभाजन आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर पोहचण्यासाठी नाशिककरांना चौथा पर्याय ; पांढुर्ली इंटरचेंजमुळे 14 किलोमीटरचा फेरा वाचणार

सिंहस्थासाठी ३५८.४३ कोटी महापालिकेला वितरित

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून नाशिक महापालिकेला आतापर्यंत ३५८.४३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून १०० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. प्राधिकरणाकडून मंजूर विकासकामांमध्ये रस्त्यांसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

त्यापैकी रस्ते कामांच्या प्रगतीनुसार ३४५.८९ कोटी रुपये तर पुलांसाठी ८०.८१ कोटी रुपये निधीपैकी १२.५४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरूट यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.