Nashik Municipal Election : नाशिकमध्ये 22 जागांवर 'टफ फाईट' : भाजपविरोधात शिंदे अन् ठाकरेंची तटबंदी; हायव्होल्टेज लढतींमुळे ऐन थंडीत शहारचं रणांगण तापलं

Nashik High Voltage Fights नाशिक महानगरापालिका निवडणुकीत काही बिग फाईट होत आहे. या लढतींकडे अवघ्या शहराचे लक्ष लागून आहे. या लढती लक्षवेधी असून नाशिकचं राजकीय वातावरण या लढतींमुळे तापलं आहे.
Nashik Municipal Election
Nashik Municipal ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांमधील एकूण 122 जागांसाठी निवडणूक होत असून तब्बल 735 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. उमेदवारी अर्ज आणि चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच प्रभागांतील प्रमुख लढती स्पष्ट झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रभागांमध्ये रंगणाऱ्या 'मेगा फाइट्सने निवडणुकीचे रण आता तापण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी भाजपने या निवडणुकीत स्वबळावर सर्वाधिक ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. दोन जणांना पुरस्कृत केलं आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात युती झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने १०२, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ४२ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीतही उद्धवसेना ७९, मनसे ३०, कॉंग्रेस २२ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने ३१ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर वंचितने स्वतंत्रपणे ५५ जागांवर उमेदवार दिले आहेत.

काही महत्वाच्या लक्ष्यवेधी लढती पुढीलप्रमाणे-

रंजना भानसी विरुद्ध गणेश चव्हाण

प्रभाग क्रंमाक १ ब मध्ये - भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी यांची शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश चव्हाण व महाविकास आघाडीच्या विशाल पोरिंदे यांच्याशी सामना होणार आहे. तर क गटात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गणेश गिते यांच्या पत्नी भाजप उमेदवार दीपाली गिते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या उर्मिला निरगुडे उभ्या आहेत. परंतु गिते यांचे पारडे या प्रभागात अधिक जड असल्याने फार काही चुरशीची लढत होईल वाटत नाही. तर ड गटात भाजपचे अरुण पवार यांचा शिंदे गटाचे प्रवीण जाधव यांच्याशी होणारा सामना लक्षवेधी ठरणार आहे.

Nashik Municipal Election
Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, दोन माजी महापौरांच्या हाती धनुष्यबाण..भाजपलाही धक्का

गुरमित बग्गा विरुद्ध अशोक मुर्तडक

नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पद एकाच वेळी भूषवलेले माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी उपमहापौर गुरमित बग्गा यंदा एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग ५ ड मध्ये दोघांमध्ये सामना रंगणार आहे. गुरमित बग्गा हे भाजपच्या तिकीटावर लढत असून अशोक मुर्तडक हे भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढत आहेत. परंतु शिंदे गटाने त्यांना पाठिंबा दिला असून त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आहे. दरम्यान याच प्रभागात 'अ' मध्ये भाजपचे खंडू बोडके आणि भाजपचे बंडखोर तथा शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे.

हिरे विरुद्ध बोरस्ते

प्रभाग ७ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते आणि भाजपचे माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्यातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. भाजपचे शहराती तिनही आमदार हिरे यांना निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावणार असल्याने बोरस्ते यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. या प्रभागात स्थायी समितीच्या माजी सभापती भाजपच्या हिमगौरी आडके विरुद्ध शिंदे गटाच्या रोहिणी शिरसाठ व भाजपचे सुरेश पाटील विरुद्ध शिंदे गटाचे राजेंद्र सूर्यवंशी यांचाही सामना लक्षवेधी ठरणार आहे.

Nashik Municipal Election
Nashik BJP : भाजपचे बंडखोर निवडणूक झाल्यावर पुन्हा कमळावर स्वार होणार? पक्षाने कारवाई न केल्याने आश्चर्य..

दोन चुलत भावांमधील लढत

प्रभाग क्र ९ 'ड' मध्ये भाजपच्या दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील विरुद्ध शिवसेनेचे दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील या चुलतभावांमध्येच सामना रंगणार आहे. दिनकर पाटील व दशरथ पाटील दोघे भाऊ असून त्यांचे कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे दोघांची मुले या निवडणुकीत एकमेकांच्यासमोर उभी ठाकली आहेत. अमोल पाटील हे दिनकर पाटील यांचे, तर प्रेम पाटील हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत. भाजपने या प्रभागात दिनकर पाटील व त्यांचे पुत्र प्रेम पाटील दोघांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच दशरथ पाटील यांनी मुलासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन उमेदवारी खेचून आणली. याच प्रभागात ब गटात भाजपचे दिनकर पाटील विरुद्ध शिवसेनेचे गुलाब माळी, महाविकास आघाडीच्या (उबाठ) कावेरी कांडेकर अशीही लढत आहे.

दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणे

प्रभाग २९ अ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. दीपक बडगुजर यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी दंड थोपाटले असून यांच्यातील लढत बघण्यासारखी राहणार आहे. याच प्रभागात ब मध्ये अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या श्रद्धा पाटील, मनसेच्या वर्षा वेताळ असा सामना होत आहे. तर ड मध्ये भाजपचे भूषण राणे विरुद्ध उबाठाचे देवाभाऊ वाघमारे यांच्यात लढत होत आहे.

सुधाकर बडगुजर विरुद्ध अतुल सानप

प्रभाग २५ अ मध्ये शिवसेना ठाकरे गटातून भाजपत दाखल झालेले सुधाकर बडगुजर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे अतुल सानप, उबाठाचे अतुल लांडगे असा तिरंगी सामना लक्षवेधी ठरणार आहे. बडगुजर यांच्याकडे एकाचवेळी चार एबी फॉर्म दिले गेले होते. त्यांच्या घरात तीन जणांना उमेदवारी मिळाल्याने ते चर्चेत आले होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश पाळत त्यांनी आपल्या पत्नी हर्षा बडगुजर यांची माघार घेतली. या प्रभाग २५ मधुन क गटातून भाग्यश्री ढोमसे व ड मधून प्रकाश अमृतकर यांना भाजप पुरस्कृत करण्यात आले आहे.

Nashik Municipal Election
Yeola Municipality : येवल्यात भाजपला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का? भुजबळ–फडणवीस चर्चेनंतरही सस्पेन्स कायम

मिलिंद भालेराव विरुद्ध प्रथमेश गिते

प्रभाग १५ मध्ये अ गटात माजी उपमहापौर तथा शिवसेना उबाठाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांचा सामना भाजपच्या मिलिंद भालेराव यांच्याशी होत आहे. प्रथमेश गिते हे वसंत गिते यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे गिते यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे. याशिवाय क गटात भाजपचे सचिन मराठे व महाविकास आघाडीचे गुलझार कोकणी या माजी नगरसेवकांमधील लढतही लक्ष्यवेधी असणार आहे.

कैलास चुंभळे विरुद्ध प्रवीण तिदमे

प्रभाग २४ मध्ये ब गटात भाजपचे कैलास चुंभळे विरुद्ध शिवसेनेचे प्रवीण तिदमे यांच्यात मोठी लढाई होणार आहे. याच प्रभागात ड गटात भाजपचे राजेंद्र महाले विरुद्ध शिवसेनेचे सागर मोटकरी व माजी नगरसेविका सीमा बढदे (उबाठा) यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच क गटात कल्पना चुभंळे यांच्याविरोधात शिवसेनेच्या डॉ. पूनम महाले, उबाठाच्या चारुशीला गायकवाड अशी ही तिहेरी लढत होणार आहे.

खैरे विरुद्ध मोरे यांच्यात लक्षवेधी

प्रभाग १३ मध्ये भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले शाहु खैरे विरुद्ध भाजपचे बंडखोर आणि शिवसेनेचे उमेदवार गणेश मोरे यांची लढत लक्षवेधी होणार आहे. याशिवाय भाजपचे बबलू शेलार विरुद्ध स्थायीचे माजी सभापती उबाठाचे संजय चव्हाण, माजी महापौर विनायक पांडे यांच्या स्नुषा अदिती पांडे विरुद्ध काँग्रेसच्या वत्सला खैरे, शिवसेनेच्या रश्मी भोसले यांच्यातील लढतीकडे शहराचे लक्ष आहे.

कुणाल वाघ विरुद्ध राहुल दिवे

प्रभाग १६ अ मध्ये भाजपचे कुणाल वाघ विरुद्ध शिवसेनेचे राहुल दिवे या माजी नगरसेवकांच्या लढतीकडे शहराचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com