Nashik News : महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही वेळातच खाली कोसळली; 16 वर्षीय श्रावणीच्या मृत्यूने नाशिक हादरले

Nashik Shravani Patil Death : महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच एका 16 वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन कोसळल्याने मृत्यू झाला. या घटनेनं नाशिक शहर हादरलं आहे.
16-Year-Old Girl Collapses After Vaccination Camp in Nashik
16-Year-Old Girl Collapses After Vaccination Camp in NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Local News: नाशिकच्या सिडको परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर भागात महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियमित लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच एका 16 वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. श्रावणी अनिल पाटील असे मयत मुलीचे नाव आहे.

लसीकरणानंतर काही वेळातच तिला चक्कर आल्याने ती रस्त्यावर कोसळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लसीकरणाच्या रिॲक्शनमुळे की पडल्यानंतर डोक्याला दुखापत झाल्याने की, इतर कुठल्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला, हे अद्याप समजलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय श्रावणी पाटील ही बुधवारी (दि.२४) दुपारी १.१५ वाजेदरम्यान वडिलांसोबत महापालिकेतर्फे आयोजित सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लसीकरण शिबिरात लस घेण्यासाठी आली होती.

सिडकोमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात तिने लस घेतल्यानंतर ती जवळील मेडिकलकडे जात असताना अचानक तिला चक्कर आली. त्यामुळे ती डोक्यावर पडून रस्त्यावर कोसळली. स्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.

16-Year-Old Girl Collapses After Vaccination Camp in Nashik
Nashik News : प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या निधनाची खोटी पोस्ट ; 'पिंडदानाचा' कार्यक्रम नाशिक पोलिसांनी रोखला..

दरम्यान परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लसीकरणानंतर अल्पावधीतच मृत्यू झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

श्रावणीने घरी सर्वांसाठी थालीपीठ बनवले होते. ते खाऊन झाल्यानंतर तिच्यासोबत लसीकरणाच्या केंद्रात आलो. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती जमिनीवर कोसळली. तिच्या नाकातून रक्त आल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करत तिला मृत घोषित केल्याची माहिती तिचे वडील अनिल पाटील यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आवश्यक चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.

16-Year-Old Girl Collapses After Vaccination Camp in Nashik
Nashik News : सीएम फडणवीसांचा नाशिकवर खास फोकस, मंत्रिमंडळ बैठकीत नाशिकच्या हिताचे 3 महत्त्वपूर्ण निर्णय

वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर लसीकरण समितीची बैठक घेतली जाईल. या प्रकरणाची केंद्र सरकारकडून सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितलं. नाशिक शहरात या लसीचा वापर थांबवल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com