BJP Politics : महापालिकेत 'गोकुळ'ची पुनरावृत्ती; स्वीकृत नगरसेवकांचा आनंद ठरला क्षणभंगुर!

Nashik Municipal BJP Politics : सध्या गोकुळचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला असतानाच आता हाच कित्ता नाशिक महापालिकेत गिरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress BJP Politics : भाजपची सत्तेची भूक काही केल्या मिटेना, असे चित्र आहे. सत्तेसाठी कोल्हापूरच्या 'गोकुळ'मध्ये केलेल्या प्रयोगाची नाशिक महापालिकेत पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नाशिक महापालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांसाठी काल अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये भाजपचे सहा, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन आणि उद्धव ठाकरे गटाचे दोघे, असे दहा जणांचे अर्ज आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र निर्माण झाले. स्वीकृत नगरसेवकांनी गुलालही उधळला.

मात्र, स्वीकृत नगरसेवकांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला आहे. भाजपने शिवसेना (उद्धव ठाकरे) फोडण्यासाठी मोठा डाव टाकला. रात्री उशिरा दहा ऐवजी 11 अर्ज स्वीकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या 16 नोव्हेंबरला होणाऱ्या महापालिकेत स्वीकृत सदस्यांसाठी निवडणूक अटळ आहे.

Nashik Municipal Corporation
BJP Politics : विधानपरिषद निवडणूक जिंकलेल्या दोन आमदारांचा 48 तासांत भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या डावाने विरोधकाच्या गोटात खळबळ!

विशेष म्हणजे भाजपने उद्धव ठाकरे गटाला कात्रजचा घाट दाखवला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी झाली आहे. आता मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांकडून भाजपचे सुनील आडके यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांकडून भाजपची शिफारस झाल्याने काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काँग्रेसच्या या शिफारशीमुळे उद्धव ठाकरे गटात फूट अटळ आहे.

Nashik Municipal Corporation
BJP Politics: विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपने विकासनिधीच रोखला, आक्रमक नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उपसले उपोषणाचे अस्त्र!

यानिमित्ताने 'गोकुळ'मध्ये केलेल्या शासननियुक्त सदस्यांच्या प्रयोगाची नाशिक महापालिकेतही पुनरावृत्ती झाली आहे. महासभेत दहा सदस्यांसाठी होणाऱ्या मतदानात ठाकरे गटात फूट पडल्यास तो न्यायप्रविष्ट विषय ठरण्याची चिन्हे आहेत. यामध्ये नियुक्त स्वीकृत नगरसेवकांची निवड अडचणीत येणार आहे. भाजपच्या या डावपेचांवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दहा सदस्यांचे अर्ज आल्याने नियुक्तीचा गुलाल उधळण्याचा नगरसेवकांचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.