Pannalal Donkey Nashik : पन्नालाल'च्या सुटकेसाठी शिवसेना मैदानात; जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत तोडगा नाही, आता न्यायालयीन लढा देणार

Shiv Sena Meets Nashik Collector Ayush Prasad for Pannalal's Release : पन्नालालच्या सुटकेसाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. भाट कुटंबाने देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे मांडले.
Shiv Sena Meets Nashik Collector Ayush Prasad for Pannalal's Release
Shiv Sena Meets Nashik Collector Ayush Prasad for Pannalal's Release Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pannalal Donkey Case Nashik : नाशिकच्या कालिका माता यात्रेत मनोरंजनाच्या खेळासाठी वापर केल्याच्या कारणावरून गोशाळेत ठेवलेल्या ‘पन्नालाल’ या गाढवाच्या सुटकेसाठी आता शिवसेना मैदानात उतरली आहे. पन्नालाल'ला गोशाळेतून परत मिळवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या मूळ मालकाने त्यासाठी न्यालायीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सोमवारी (दि. २) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. पन्नालालला मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मानवीय दृष्टिकोनातून हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे निवेदन शिवसेनेने दिले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, दीपक डोके, गोविंद भाट, उत्तम जाधव, बंटी गांगुर्डे यांच्यासह पन्नालालचे मालक असलेले भाट कुटुंबीय उपस्थित होते.

मात्र, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयात दाद मागावी असा सल्ला जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिला. या संदर्भातील आवश्‍यक कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधिज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले.

Shiv Sena Meets Nashik Collector Ayush Prasad for Pannalal's Release
Nashik Drought News : नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

त्यामुळे पन्नालालच्या सुटकेसाठी शिवसेनेने पुढाकार घेत न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नालालच्या सुटकेसाठी सक्षम न्यायालयात अर्ज केला जाणार आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी प्रशासनातर्फे त्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वस्त केल्याबद्दल शिवसेना व भाट कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

Shiv Sena Meets Nashik Collector Ayush Prasad for Pannalal's Release
Nashik News : उन्हाळ्यात चाराटंचाईचे संकट? नाशिकचे जिल्हाधिकारी, सीईओंनी शेतकऱ्यांना सांगितले बचतीचे ४ उपाय

पहिल्यांदा चढणार कोर्टाची पायरी

नाशिककरांचे मनोरंजन करण्यासाठी पन्नालाल हे गाढव भाट कुटुंबियांसोबत शहरात आले होते. नवरात्रोत्सवात या कुटुंबाने कालिका माता यात्रेत पाल ठोकला. पन्नालाल का जलवा या खेळाचे प्रयोग सुरु झाले. लोकांनीही हा खेळ पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, या गाढवाचा मनोरंजनासाठी वापर केला जात असल्याचा काही प्राणीप्रेंमींनी आक्षेप घेतला. त्यानंतर याप्रकरणी प्राणी क्रुरता कायद्यातंर्गत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

पन्नालाल याला गोशाळेत सुपूर्त करण्यात आलं आहे. पन्नालालला त्याच्या मूळ मालक जमुनाबाई व किशन भाट यांच्या कुटुंबापासून दहा दिवसांपासून दूर आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून भाट कुटुंबीयांनी त्याचे संगोपन केले. सध्या तो आठ वर्षांचा असून कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मालकांपासून झालेली ताटातूट असह्य होत आहे. त्याच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंतची काळजी घेणारे भाट कुटुंबीय त्याच्यासाठी व्याकूळ झाले आहे. दसऱ्याच्या दिवशीही कुटुंबीयांनी गोशाळेत जाऊन पन्नालालची पूजा केली होती. अल्पशिक्षीत असलेल्या भाट कुटुंबाला पन्नालाच्या सुटकेसाठी आता पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.