Nashik Politics : नगरपालिका निवडणुकीत ४४० होल्टचा झटका बसताच भाजप बॅकफूटवर, आता शिवसेनेसोबत युतीसाठी मनाची तयारी..

Nashik Municipal Elections : सुरुवातीला नाशिका महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळाची तयारी केली होती. एकट्याने शंभर प्लसचा नारा दिला होता. मात्र आता भाजप बॅकफूटवर आल्याचे दिसतय.
Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नगरपरिषद निवडणुकीतील निकालात नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट भाजपवर भारी पडला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मनमाड, नांदगाव व सटाणा या पाच नगरपालिकांवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपला केवळ पिंपळगाव बसवंत, ओझर व चांदवड या तीनच ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणता आले. तर राष्ट्रवादीचेही भगूर, सिन्रर व येवला या तीन ठिकाणीच नगराध्यक्ष निवडून आले.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे तिथे शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी असे घडले आहे. त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत जो भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे भाजपच्या कैलास घुले यांचा पराभव करुन शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार या विजयी झाल्या. तसेच इगतपुरीमध्ये भाजपचे उमेदवार संजय इंदुलकर यांचा शिवसेना शिंदे गटाचे मंगेश शिरोळे यांनी पराभव केला. तसेच सटाण्यातही शिवसेना शिंदे पक्षाच्या हर्षदा पाटील विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या योगिता मोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

ज्या ठिकाणी भाजप व शिवसेमध्ये थेट लढत झाली त्याठिकाणी भाजप विरोधातील मते ही शिवसेना शिंदे गटाकडे वळाली. राज्यातही तसेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अशा ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला व शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला. प्रामुख्याने नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तीन्ही ठिकाणी तसे घडले. आता नाशिक महापालिका निवडणुकीतही शिवसेना-भाजप युती न झाल्यास व दोन्ही पक्ष समोरासमोर लढल्यास नगरपालिका निवडणुकीत जसे झाले तसे भाजप विरोधी मते शिवसेना शिंदे गटाला मिळून भाजपला फटका बसू शकतो. या भीतीने भाजप बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
BJP Politics : नाशिकमध्ये भाजपला राष्ट्रवादी नकोच? विनवण्या करुनही गिरीश महाजन युतीबाबत चर्चा करायला तयार नाही

सुरुवातीला एकट्याने शंभर प्लसचा नारा दिलेल्या भाजपने आता शिवसेनेसोबत युती करण्याची मानसिक तयारी केली आहे. त्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिवसेचे मंत्री दादा भुसे यांच्यात चर्चा सुरु आहे. जागावाटपात सुवर्णमध्य काढून महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल असे स्वत:मंत्री गिरिश महाजन यांनीच म्हटलं आहे.

Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
Sinnar Politics : खासदार वाजेंचा गड आला पण सिंहच कसा पडला? कोकाटे-वाजेंच्या कथित सेटिंगच्या चर्चांनी राजकारण तापलं..

आज मुंबईत नाशिकच्या जागावाटपाबाबत भाजपची शिवसेनेसोबत चर्चा देखील होणार आहे. भाजपने आयात केलेल्या उमेदवारांचा विचार करता १२२ पैकी ८२ जागांवर आपले उमेदवार फिक्स केले आहे. उरलेल्या ४० जागांवर भाजप शिवसेनेसोबत वाटाघाटी करायला तयार असून त्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनीच स्पष्ट केले आहे. परंतु शिवसेनेला ५० जागा हव्या असल्याने तिथे घोडे अडल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com