Shivsena News : संभाजी भिडे यांच्याविरोधात नाशिक रोडला गुन्हा दाखल

Nashik road police station file a case against Manohar Bhide-शिवसेनेसह विविध संघटनांनी पोलीस ठाण्यातठिय्या देत गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले.
Shivsena leaders at Police Station
Shivsena leaders at Police StationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : वादग्रस्त सामाजिक कार्यकर्ते मनोहर भिडे यांच्या विरोधातील आंदोलने थांबायची चिन्हे नाहीत. नाशिक शहरात याबाबत विविध संघटना रोज आंदोलन करीत आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) तक्रारीवरून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Road Police registered a case against Manohar Bhide)

शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत (Police) तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोहर भिडे (Manohar Bhide) याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

Shivsena leaders at Police Station
Pachora News : मनोहर भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारले!

वादग्रस्त मनोहर भिडे सातत्याने राष्ट्रपुरूषांच्या विषयी अवमानजनक वक्तव्ये करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी त्यांनी नुकतेच अतिशय तथ्यहीन आणि कपोलकल्पीत विधान केले आहे. त्याविरोधात राज्यभरात निषेधाच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

यावेळी माजी आमदार योगेश घोलप म्हणाले, मनोहर भिडे कोणाच्या पाठींब्याने एव्हढी आगपाखड करतात, हे लपून राहिलेले नाही. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले यांसह विविध समाजसुधारकांच्या विरोधात त्यांनी अशीच वक्तव्ये केली होती. आता त्यांनी या सर्वांवर कडी करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानजनक विधान केले आहे. त्याची अत्यंतं तीव्र प्रतिक्रीया उमटली आहे. समाजात मोठ्या प्रामणात नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे.

Shivsena leaders at Police Station
Vijay Wadettiwar Opposition Leader : विजय वडेट्टीवार अखेर विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसले

या वेळी व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, बिझनेस बँकेचे संचालक पुरुषोत्तम फुलसुंदर, माजी नगरसेवक अस्लम मणियार, केशव पोरजे, शंकर मंडलिक, संजय अढांगळे, जयंत गाडेकर, योगेश गाडेकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला- क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.