Shivsena Leader Accident: नाशिकमधून धक्कादायक बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्याला कारनं उडवलं

Shivsena News: माजी आमदार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यांचा अपघात झाला आहे. त्या 2014 विधानसभा निवडणूकीत त्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत.
Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Senasarkarnama
Published on
Updated on

Nashik News: माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. घराजवळ फेरफटका मारत असताना गावित यांना कारनं उडवलं आहे. या अपघातात माजी आमदार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

माजी आमदार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या निर्मला गावित (Nirmala Gavit) यांचा अपघात झाला आहे. त्या 2014 विधानसभा निवडणूकीत त्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. माजी आमदार निर्मला गावित या आपल्या घराजवळ नातवंडाला फिरवत असताना मागून आलेल्या एका चार चाकीने त्यांना जोरात उडवले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र करत इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता. गावित यांच्या पक्षप्रवेश हा त्यावेळी उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता.

Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Eknath Khadse Politics : नाथाभाऊंना आयती संधी मिळाली; भाजपच्या मंत्र्यांना टाकले धर्मसंकटात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाल्यानं त्यांच्यासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत चिंतेंचं वातावरण निर्माण झालं आहे. गावित यांच्या समर्थकांनी अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.

Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Sanjay Shirsat News : आमचा संयम सुटतोय; संजय शिरसाट यांचा भाजपला कडक इशारा!

इगतपुरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या निर्मला गावित या महाविकास आघाडीकडून प्रमुख इच्छुक उमेदवार होत्या. काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाच्या इगतपुरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ही त्यांची एकमेव शिफारस केली होती. मात्र, पक्षाने लकी जाधव यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली.यानंतर निर्मला गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com