

Nashik Politics : नाशिक महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीपाठोपाठ सर्वाधिक महत्वाच्या असलेल्या स्थायी समितीवर सदस्य नियुक्तीचा मुहुर्त ठरला आहे. १२२ नगरसेवक असलेल्या नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी सोमवारी (ता. १६) विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे.
नाशिकमध्ये भाजपने सत्तेत शिवसेनेला सोबत घेत स्वत:कडे महापौरपद ठेवले आहे तर उपमहापौरपद शिवसेनेला दिले आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर आडके महापौर झाल्या आहेत. तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर आहेत. महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन पक्षील तौलानिक बळाची माहिती दिली. दरम्यान ही विशेष महासभा असली तरी नियमित महासभा ही दि. २० फेब्रुवारीस होणार आहे. सदस्य निवडीची तारीख निश्चित झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
स्थायी समितीवरील सदस्यांची निवड ही पक्षील तौलानिक बळानुसार ठरत असते. मात्र नाशिकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी तसेच भाजपने शिवसेनेला सत्तेत सोबत घेतले असले तरी शिवसेनेच्या २६ व मनसेच्या एका नगरसेविकेने एकत्रितपणे आघाडी करुन गटनोंदणी केलेली असल्याने जपच्या गुणांकनात घट झाली आहे. परिणामी स्थायी समितीत १० ऐवजी नऊ सदस्य भाजपचे जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच शिवसेना-मनसेच्या आघाडीमुळे भाजपचा एक सदस्य घटून भाजपला फटका बसू शकतो.
स्थायी समितीवर सोळा सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. एकुण १२२ नगरसेवकांच्या सभागृहात स्थायी समितीच्या सोळा सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५ चा कोटा आवश्यक आहे. भाजपला मिळालेल्या सदस्य संख्येनुसार भाजपच्या वाट्याला दहा जागा येणे अपेक्षित होते. तर २६ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला(शिंदे गट) तीन सदस्य तर पंधरा सदस्य संख्या असल्याने शिवसेना (उबाठाला) दोन तर चार सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उतरत्या क्रमानुसार एक जागा होती. परंतु, शिवसेना व मनसेने एकत्रीत शहर विकास आघाडी म्हणून नोंदणी केल्याने स्थायी समितीवर शिवसेनेच्या कोट्यात वाढ होऊन एक सदस्य अधिक जाण्याची शक्यता आहे. कारण सदस्यांची नियुक्ती करताना एकत्रित गुणांकन करुन सदस्य निवडले जाणार आहे. त्याचा परिणामी म्हणून भाजपचे गुणांकन घटून भाजपचे स्थायी समितीवर १० ऐवजी ९ सदस्य जातील असा अंदाज आहे.
त्यामुळे संख्याबळानुसार आता भाजपचे ९, शिवसेना व मनसेचे एकुण ४, शिवसेना उबाठाचे दोन आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे एक असे सोळा सदस्य निवडून जाणार आहेत. स्थायी समितीच्या सदस्य पदासोबतच सभापतीपदासाठी चुरस व मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.