

नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा खानला अटक करण्यात आली.
निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले असून ती अनेक दिवसांपासून फरार होती.
धर्मांतर घडवून आणण्यात तिची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
Nashik TCS Conversion Case Latest Update : राज्यासह देशभर गाजलेल्या नाशिकमधील 'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून नाशिक पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. निदा खानवर धार्मिक भावना दुखावणे, तसेच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचे गंभीर आरोप आहेत. तर शुक्रवार (ता.८) तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्न प्रकरणात निदा खान मुख्य संशयित आरोपी आहे. तर या प्रकरणात तपास यंत्रणांनी आधीच काही आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते.
पण निदा खान जवळपास दीड महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हती. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. निदा खानच्या मागावर नाशिक पोलिसांची दोन पथके होती. अखेर तिचा ठावठिकाणा लागताच छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून नाशिक पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी आणि तांत्रिक तपास केला. यावेळी निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी (ता.७) रात्री सापळा रचून पोलिसांनी शिताफीने तिला ताब्यात घेतले. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून, त्यामध्ये पुण्यातील एचआर हेड अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. शहर आयुक्तालयात यासंदर्भात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
पोलिस तपासानुसार, टीसीएसमधील काही महिला कर्मचाऱ्यांचे कथित ब्रेनवॉश करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यामध्ये निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचा संशय आहे. पीडित महिलांना नमाज पठण, बुरखा परिधान करणे याबाबत माहिती देणे, तसेच मुस्लिम धर्माशी संबंधित पुस्तके उपलब्ध करून देणे, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि मुस्लिम धर्माचे गुणगान करणे, अशा माध्यमांतून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून, त्यामध्ये पुण्यातील एचआर हेड अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. शहर आयुक्तालयात यासंदर्भात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान निदा खान ही फरार होती. तर ती गरोदर असल्याचे कारण पुढे करून तिने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र तिचा अटकपूर्वक जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर आता पोलिसांनी तिला अटक केली असून सध्या नाशिक पोलिस तिची चौकशी करत आहेत. तर निदा खानच्या चौकशीत आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1. निदा खानला कुठून अटक करण्यात आली?
निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.
2. हे प्रकरण नेमके कशाशी संबंधित आहे?
हे प्रकरण लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतराशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
3. निदा खान किती दिवसांपासून फरार होती?
ती गेल्या काही दिवसांपासून फरार होती आणि पोलीस तिचा राज्यभर शोध घेत होते.
4. पोलिसांच्या तपासात काय समोर आले आहे?
धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी निदा खानकडे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
5. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.