Vivek Kolhe Politics : फसवणूक करणारे दराडे शिक्षकांचे आमदार कसे होणार? कोल्हेंचा घणाघात

Vivek Kolhe argues CM shall enquiry of Kishore Darade : दराडे यांच्या संस्थेत अनेक बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप कोल्हे यांनी केला
Vivek Kolhe- Kishor Darade
Vivek Kolhe- Kishor DaradeSarkarnama
Published on
Updated on

Teachers constituency 2024 : शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता शिगेला पोहोचली आहे. प्रमुख उमेदवारांचा प्रचार जोरात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आमदार किशोर दराडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी आपल्या प्रचाराविषयी पत्रकारांशी संवाद केला.

ते म्हणाले, हा मतदार संघ 54 तालुक्यांचा आणि 70 हजार मतदारांचा आहे. त्यात अनेक शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. विविध संस्थांनी देखील आम्हाला सहकार्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MahaVikas) आणि महायुती या दोन्ही उमेदवारांची स्थिती अतिशय अवघड झाली आहे. त्यामुळे हे उमेदवार सध्या गैरप्रकार करण्याला प्राधान्य देत आहेत. प्रचारा दरम्यान मतदार यादीतील अनेक शिक्षकांचा पत्ताच लागला नाही

Vivek Kolhe- Kishor Darade
Eknath Shinde Politics : किशोर दराडेंसाठी आता मुख्यमंत्री करणार बॅटिंग; मॅच जिंकणार का ?

अनेक ठिकाणी नववी पास, शेतमजूर, मेडिकल दुकानदार, हमाल असे लोक मतदार झाल्याचे आढळले आहे. यातील बहुतांशी गैरप्रकार विद्यमान आमदारांच्या संस्थेची संबंधित आहेत. त्यामुळे या प्रकाराची तक्रार यापूर्वीच काही उमेदवारांनी प्रशासनाकडे केली आहे. आता गैरशिक्षक मतदान करणार नाही, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्याबाबत ते काय कार्यवाही करतात याकडे आमचे लक्ष असेल. असे मतदान झाल्यास ते वेबकॅम वर होणार आहे. त्यामुळे बोगस मतदान करणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू.

Vivek Kolhe- Kishor Darade
Nashik Teachers Constituency Election: भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का; नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा ?

यावेळी कोल्हे यांनी आमदार दराडे यांच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. गैरप्रकार करणारे आणि गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती शिक्षकांचे प्रतिनिधी कसे होऊ शकतात? हा शिक्षकांवर अन्याय आहे. तो आम्ही होऊ देणार नाही. सध्या आमचा पक्ष आणि ध्येय फक्त शिक्षकच आहे, असेही कोल्हे म्हणाले. दरया मतदारासंघातून निवडणूक लढविणारे दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून त्यांना भाजपने देखील पाठींबा दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील दराडे यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीमधील चुरस चांगलीच वाढली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com