Drug Mafia Lalit Patil : ड्रग्ज व्यवसायाला सत्ताधारी नेत्यांचा आशीर्वाद! शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही मुद्दा तापवला

Nashik Crime News : नाशिक शहर हे एक तीर्थक्षेत्र असून, आपल्या पवित्र भूमीत असल्याप्रकारचे चुकीचे...
Drug Mafia Lalit Patil
Drug Mafia Lalit PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Nashik News : नाशिकच्या ड्रग्जप्रकरणी राजकीय पक्षांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर आरोप केले आहेत. विशेषतः पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर विरोधकांचा रोख आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील पुढे आली आहे.

मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करीत कारवाई केली. त्याचा स्थानिक पोलिसांना थांगपत्ताही लागला नाही. याबाबत सत्ताधारी राजकीय नेते, काही पोलिस अधिकाऱ्यांचा या व्यवसायाला आशीर्वाद असावा, असा आरोप या वेळी करण्यात आला.

या वेळी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी मागील काही महिन्यांपासून नाशिक शहरात वाढते अमली पदार्थ विक्री एमडी ड्रग्ज, चरस, गांजा, गुटखा, कुत्ता गोळी विकणारी टोळी सक्रिय आहे. त्याने गुन्हेगारी वाढत आहे.

देशाचं भविष्य असलेले युवकांचे भवितव्य अमली पदार्थांमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नाशिक शहर हे एक तीर्थक्षेत्र असून, आपल्या पवित्र भूमीत असल्याप्रकारचे चुकीचे व्यवसायाचे प्रमाण वाढत असेल, तर नाशिक शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आपल्या तीर्थ भूमीकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलण्यास वेळ लागणार नाही. ही बाब लक्षात घेऊन आपण असल्या अमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी पावले उचलावीत.

Drug Mafia Lalit Patil
Mumbai NCP News: मुंबईसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय; राखी जाधव यांच्यावर सोपवली 'ही' जाबाबदारी

महिलांच्या दागिने चोरीचे प्रमाणदेखील वाढत असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मादक पदार्थांच्या आहारी गेलेले समाजकंटक गुन्हे करायलादेखील घाबरत नाहीत. शहराच्या हितासाठी आपण लवकरात लवकर हे गुन्हेगारी थांबवावी, अन्यथा जनहिताचा विचार करून शहरातील महिला, युवकांचा हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करील, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Drug Mafia Lalit Patil
Ahmednagar Politics : तेलंगणातील भाजप आमदार टी. राजासिंह यांची नगरमध्ये सभा अन् 'एमआयएम' अलर्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.