Malegaon NCP News : आयुक्तांकडून १०० कोटी हडपण्याचा डाव?

NCP leader Asif shaikh directly accused the commissioner-मालेगाव महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या निविदांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा थेट आरोप
Dada Bhuse & Asif Shaikh
Dada Bhuse & Asif ShaikhSarkarnama
Published on
Updated on

NCP Politics on tender : मालेगाव महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील कामकाजाबाबत राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्तांवर ५०० कोटींच्या निविदेबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. (Malegaon Underground Sewerage scheme tender in Doubt)

मालेगाव महापालिकेच्या (Malegaon) आयुक्तांबाबत स्थानिक नेत्यांबाबत सातत्याने आरोप होत आहेत. आता राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरुद्ध शिवसेना (Shivsena) वाद रंगण्याची शक्यता आहे.

Dada Bhuse & Asif Shaikh
Bhujbal v/s Gholap Politics : बबनराव घोलप यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही!

शहरासाठी महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पाचशे कोटी रुपये खर्चाच्या भूमिगत गटार योजनेच्या निविदा उघडण्यास होणारा विलंब संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. निविदा दाखल करण्यासाठी १४ ऑगस्ट ही अखेरची मुदत होती. मुदतीत चार निविदा दाखल झाल्या आहेत. एक महिना उलटूनही या निविदा उघडल्या गेल्या नाहीत. यामागे आयुक्त काही ठेकेदारांना हाताशी धरून गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याची शक्यता असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला.

याबाबत शेख म्हणाले की, आपण यापूर्वीही या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती यासह विविध संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधले होते. कल्याण येथील ईगल नामक संस्थेलाच ही निविदा मिळावी, यासाठी संगनमत करून तीन निविदा टाकण्यात आल्या. दोन वेळा मागविलेल्या निविदा प्रक्रियेत एकूण चार निविदा आल्या आहेत. चारही निविदा उघडण्यात याव्यात. चौथी निविदा अडचणीची ठरत असल्याचा संशय आहे.

ईगल कंपनीला काम देण्यासाठी ही धडपड सुरू आहे. या षडयंत्रामागे कोण आहे, याचा शोध घ्यावा. निविदा निर्धारित दरापेक्षा जितक्या जास्त टक्के दराने देण्यात आली अथवा मंजूर करण्यात आली तर ज्या जादा दराने निविदा देण्यात येईल. तितक्या रकमेचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे समजावे, असेही शेख यांनी सांगितले.

साधारणतः पाचशे कोटींची निविदा दहा टक्के जादा दराने दिल्यास ५० कोटी घशात घालण्याचा किंवा २० टक्के जादा दराने दिल्यास १०० कोटी हडपण्याचा हा डाव आहे. पवारवाडी रस्ता कामासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरणे आंदोलन केले. हे काम सुरू करण्याचे आश्‍वासन मिळाले होते. या कामासाठी ५ निविदा आल्या. त्याही उघडल्या नाहीत. महापालिका आयुक्त असलेल्या भालचंद्र गोसावी यांनी प्रशासक पदाचा कार्यभार आल्यापासून तेच मंजूर कामाची निविदा जादा दराने देत असल्याचा आरोप शेख यांनी केला.

Dada Bhuse & Asif Shaikh
Nashik Shivsena News : भेटीगाठी म्हणजे दबावाचे राजकारण नसते!

पालकमंत्री असल्याने, तसेच मालेगाव शहर हे दादा भुसे यांचे कार्यक्षेत्र असल्याने महापालिकेच्या कामकाजावर थेट नियंत्रण असते, हे लपून राहिलेले नाही. त्यात थेट गैरव्यवहाराचा आरोप होत असल्याने यामध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांतच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

Dada Bhuse & Asif Shaikh
Nandurbar Protest News : ...तर ‘ओबीसी’ वर्गावर होणार मोठा अन्याय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com