NEET Paper leak Scandal : काँग्रेसचा महापालिकेला इशारा; मोटेगावकरचे नाशिक कनेक्शन तपासण्याची मागणी!

NEET paper leak controversy Motegaonkar Nashik connection : नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर यांच्या कथित नाशिक कनेक्शनची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. महापालिका प्रशासनालाही दिला इशारा.
Shivraj Motegaonkar
Shivraj MotegaonkarSarkarnama
Published on
Updated on

Congress News : देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटीतील संशयित शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकर याच्या आरसीसी क्लासेसच्या नाशिक मध्ये शाखा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला असण्याची शक्यता आहे.

या संदर्भात काँग्रेसच्या श्रमशक्ती कामगार संघटनेने चौकशीची मागणी केली आहे. आरसीसी क्लासेसच्या नाशिकला शाखा होत्या. अनेक विद्यार्थी या आक्रमक जाहिरातींना बळी पडले असावेत.

Shivraj Motegaonkar
Aadhaar authentication history check : तुमच्या नकळत कोण करतंय तुमच्या 'आधार'चा वापर? घरबसल्या अवघ्या 2 मिनिटांत अशी घ्या माहिती!

शिक्षण भर या क्लासेसच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. विद्यार्थी नीट, जेईई आणि यूपीएससीच्या परीक्षांसाठी या क्लासेसची जोडले गेले होते. सध्या मात्र मोटेगावकर याला अटक झाल्याने क्लासेस बंद पडले आहेत. त्यात काही विद्यार्थी नाहक भरडले गेले असावेत.

संबंधित क्लासेसच्या शहरभर मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती का. त्याचा जाहिरात कर पालिकेकडे भरण्यात आला होता का? याची माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसच्या वसंत ठाकूर यांनी केली आहे.

राज्यभर आरसीसी क्लासेस चा जाहिरातीच्या माध्यमातून गवगवा आला होता. स्पर्धेच्या युगात अनेक विद्यार्थी त्यात आकर्षित होतात. मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण त्या माध्यमातून होते. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी या क्लासेसला जात होते. नीट परीक्षेचे प्रश्नपत्रिका ल

Shivraj Motegaonkar
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 'एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही!' हप्ते थांबल्यानंतर अदिती तटकरेंचे मोठे विधान; समोर आली 4 मोठी कारणं

लिक झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांना कोणीही वाली नाही. त्यांच्या पालकांचे झालेले शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान भरून देण्याबाबत राज्य शासन आपली जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com