Newasa firing case : नेवाशात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयातून हल्ला; गोळीबारात एक गंभीर

Man critically injured in an alleged attack and shooting in Nevasa; five suspects arrested : तलवार, कुऱ्हाड, कोयता आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप; प्रकरणी पाच संशयितांना अटक, नेवासा पोलिसांकडून तपास सुरू.
Newasa firing case
Newasa firing caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar crime news : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, चाकू आणि लाकडी दांडक्याच्या हल्ल्यानंतर बंदुकीची गोळी झाडून खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकाराने खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरच्या नेवासा शहराजवळील साईनाथनगर भागातील नागफणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशियतांना अटक केली आहे, अशी माहिती नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

रमेश छगन भोसले असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळी लागली असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Officer) सांगितल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले.

रमेश भोसले यांच्याबरोबर इंदू भोसले व सागर भोसले हे दोघेही जखमी झाले आहेत. जखमी भोसले यांची भावजय सपना भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुरदर्शन यांनी भेट घेऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Newasa firing case
Ahilyanagar DCC Bank Election : विखे पाटील-घोगरे वाद आता हायकोर्टात? जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही अर्जांवर मोठा निर्णय

रमेश भोसले, त्यांचा भाऊ शहाराम भोसले हे घरासमोर कुटुंबासह झोपले असतानाच, दहा जणांच्या टोळक्यांनी रमेश भोसले तू पोलिसांचा खबऱ्या होता का? तू पोलिसांना आमच्याबद्दल माहिती देतो का? तुझा आता जीवच घेतो, असे म्हणून तलवारीने, कुऱ्हाडीने, कोयत्याने हल्ला केला. रमेश भोसले जीव वाचवण्यासाठी पळत असतानाच, त्यांच्यावर पाठीमागून बंदुकीतून गोळी झाडण्यात आली.

Newasa firing case
Beed Crime News : बीडमध्ये 'खाकीने' लाज आणली... PSI थेट घरात घुसला अन् एकट्या विवाहितेबरोबर नको-नको ते केले

फिर्यादी, जखमी अन् आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी व जखमी नागफणी भागात राहतात, तर आरोपी नेवासा तालुक्यातीलच देवगडजवळ राहतात. आरोपीविरोधात यापूर्वीच शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच या दोन्ही गटात पूर्वी देखील वाद होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com