Niphad stray dogs : निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पेटला; ठाकरेंचा शिलेदार भलताच आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच कुत्रे सोडले

Four stray dogs were brought into Niphad civic office over alleged administrative inaction : मोकाट कुत्र्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप; युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांचे आंदोलन, प्रशासनाला तातडीच्या कारवाईचा इशारा
Niphad stray dogs
Niphad stray dogsSarkarnama
Published on
Updated on

Niphad stray dog protest : निफाड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न आता आक्रमक आंदोलनापर्यंत पोहोचला आहे.

मोकाट कुत्र्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे आणि नगरसेविका रूपाली रंधवे यांनी नागरिकांसह नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चार मोकाट कुत्रे आणले. त्यानंतर ही कुत्री मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलासमोर सोडण्यात आली.

या प्रकारामुळे नगरपंचायतीच्या (Municipal) कार्यालयात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. टेबलासमोरील खुर्चीवर बसलेले मुख्याधिकारी भामरे हेही कुत्र्यांमुळे काहीसे मागे सरकले. प्रशासनाच्या निषेधार्थ ही कृती केल्याचा दावा विक्रम रंधवे यांनी केला आहे.

निफाड शहरात गेल्या सहा महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाकडून (Shivsena UBT) यापूर्वीही करण्यात आली होती. यासंदर्भात प्रशासनाला शहरातील परिस्थितीचे फोटो आणि प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे रंधवे यांनी म्हटले आहे.

Niphad stray dogs
Death Sentence : आठ वर्षीय मुलीची हत्या; 70 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Niphad stray dogs
Gadchiroli Civil Surgeon suspended : गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; चौकशीचे आदेश

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रंधवे यांनी मुख्याधिकारी भामरे यांच्या टेबलाला दोन नोटांचे हार घातले. नगरपंचायत प्रशासन शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्याधिकारी निफाडमध्ये नियमित मुख्यालयी राहत नसल्याचा आणि नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याचा आरोपही रंधवे यांनी केला. मात्र, या आरोपांबाबत प्रशासनाची स्वतंत्र भूमिका समोर आलेली नाही.

पुढच्या वेळी गाडीत कुत्रे सोडू

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही, तर पुढील आंदोलन आणखी आक्रमक असेल, असा इशारा विक्रम रंधवे यांनी दिला. नागरिकांच्या समस्या प्रशासनाला समजावून सांगण्यासाठी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडण्याच्या या प्रकारावर प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नासोबतच आंदोलनाच्या पद्धतीवरूनही चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com