Sanjay Raut : ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा ही स्वतंत्र राहिलेली नाही. ती भाजपाची शाखा झाली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवतात त्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते, अशी घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. रोहित पवार यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले, ईडीच्या त्रासातून मी गेलो आहे आणि अजूनही तो सुरू आहे. अजित पवार यांना आणि कुटुंबाला ईडीने त्रास दिला. ते आज भाजपच्या छत्रछायेखाली आहेत. त्यामुळे त्यांना शांत झोप लागते. हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने त्रास दिला. ते ही भाजपात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा ईडीग्रस्त आहेत. ईडीला घाबरूनच ते तिकडे गेले असल्याचे राऊत म्हणाले.
आम्ही आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. दादा भुसे यांच्या घोटाळ्यांची यादी दिली. ईडीने त्यांना नोटीस का पाठवली नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ईडी भाजपाची शाखा असल्याप्रमाणे पेडणेकर, चव्हाण, वायकर यांना नोटीस काढते. त्यांची चौकशी करते. संजय राऊत यांना अटक करते. जे भाजपाचा भ्रष्टाचार बाहेर काढतात, त्यांना ईडी लगेच आत टाकते, अशी सणसणीत टीका राऊत यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, रामाच्या भक्तीचे नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला असत्याची कास धरून कारवाई करतात. पश्चिम बंगालमध्ये आज छापे पडलेत. भ्रष्ट असलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे मात्र सोयीस्कर कानाडोळा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा पाहा. आम्हाला ज्ञान देता, तुमच्या खाली लागलेला जाळ पाहा, असा सल्ला राऊत यांनी दिला. दरम्यान, रोहित पवार यांच्या पाठीशी शरद पवार उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पवारसाहेब त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात जात आहेत, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, आम्हीसुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहोत. ईडीच्याविरोधात एकवटण्यासाठीच कालचे अधिवेशन झाले, गंगाआरती झाली. देशात सुरू असलेली मनमानी थांबवण्यासाठी लढा सुरू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.