Parth Pawar : पार्थ पवारांना काही लोक जाणीवपूर्वक टार्गेट करतायत; त्यांना केंद्रात मंत्री करा, दादांच्या लाडक्या आमदाराची मागणी

Manikrao Kokate On Parth Pawar : आमदार माणिकराव कोकाटे यांनी पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन अधिकार द्यावेत, अशी मागणी केली. तेच दादांचा वारसा समर्थपणे चालवतील म्हणाले.
Parth Pawar
Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे अशी मागणी सध्या पक्षातून पुढे येत आहे.

यासंदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि दादांचे निकटवर्तीय मानले जाणारे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आता मोठं भाष्य केलं आहे. दादांच्या कुठल्याही वारसाला कुठेही चांगली संधी मिळत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवारांना जाणीवपूर्वक काही लोकांकडून टार्गेट केलं जात आहे. पार्थ पवार हे केवळ तरुण आहेत म्हणून त्यांची टिंगल केली जाते. परंतु तरुण पिढी हेच उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलंच पाहिजे.

दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार कोकाटेंनी केली. पार्थ पवार हेच अजित पवार यांचा वारसा समर्थपणे पुढे नेतील असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

Parth Pawar
Parth Pawar: पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचे सुनेत्रा पवारांना पत्र

पार्थ पवार हेच अजित पवार यांचा वारसा समर्थपणे पुढे नेतील. दादांचे राजकीय वारसदार म्हणून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार कोकाटेंनी केली. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलताना सुनेत्रा पवार जो निर्णय घेतली, तो मान्य राहील. त्या जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी राहील अशी भूमिका कोकाटेंनी मांडली.

तर, स्वतःच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना, "माझ्यापेक्षा माझ्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचं दुःख अजितदादांना जास्त झालं होतं, त्यांना माझा राजीनामा घ्यावा असे मुळीच वाटत नव्हते. परंतु तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यांनी मला 'मी तुझ्यासोबत आहे' असा आधार दिला होता. माझ्याविरोधात अनावश्यक षडयंत्र रचण्यात आलं, पण दादांनी शेवटपर्यंत साथ सोडली नाही.

Parth Pawar
Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, अजितदादांची आठवण जपली

अजितदादांच्या निधनाचा धक्का आजही सहन होत नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संपूर्ण सत्य जनतेसमोर आले पाहिजे. विमान सरळ जात असताना अचानक तिरपे होऊन कोसळते, ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचा घाबरलेला आवाज ऐकू येतो, मग नेमकं काय घडलं? या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मागणी केली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत भूमिका मांडल्याचे कोकाटेंनी सांगितले.

अजित पवार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी कायम आहेत. ते मुख्यमंत्री झाले असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते असे सांगताना कोकाटे यांनी वसंतदादा पाटील यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम नेता पाहिला नसल्याचे नमूद केले. आम्ही आजही कोणत्याही बॅनरवर त्यांच्या नावापुढे 'स्वर्गीय' हा शब्द लावत नाही असे सांगताना कोकाटे भावूक झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com