PM Narendra Modi Rally : पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, धुळे, दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (बुधवारी) जाहीर सभा घेतली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी NCPअसा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
'नकली शिवसेना ShivSena, नकली राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसमध्ये विलीन होणार हे नक्की. ते जेव्हा विलीन होतील तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेबांची येईल. बाळासाहेब म्हणाले ज्या दिवशी वाटेल की शिवसेनेची काँग्रेस Congress होत आहे त्या दिवशी शिवसेना बंद करेल. म्हणजे नकली शिवसेना शिल्लक राहणार नाही. हा जो विनाश होत आहे तो बाळासाहेबांना दुखी करत असेल.', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नकली शिवसेनेने बाळासाहेबांचे स्वप्न तोडले. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आयोद्धामध्ये राममंदिर व्हावे, बाळासाहेबांचे स्वप्न होते जम्मू कश्मीर 370 रद्द व्हावे. ही स्वप्न पूर्ण झाली मात्र याची सगळ्यात जास्त चिड नकली शिवसेनेला येत आहे. काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठपणेचे निमंत्रणाला नाकारले नकली शिवसेना तोच मार्ग निवडला. काँग्रेसचे लोक मंदिराबाबत काहीही बोलत आहेत. आणि नकली शिवसेना गप्प आहे. यांची ही पार्टनर पापाची पार्टनरशीप आहे, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.
नकली शिवसेनावाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन फिरत आहे. जी काँग्रेस वीर सावरकरांना दिवसरात्र शिव्या देत आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी राष्ट्रभक्त जनता जेव्हा हे बघते तेव्हा त्यांना राग अनावर होत आहे. मात्र, नकली शिवसेनेचा इतका अहंकार वाढला आहे की त्यांना लोकांच्या भावनांशी काही देणघेण नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.