Ashok Kharat Crime: अशोक खरातवर सर्व प्रकरण ढकललं, तरीही कोर्टानं कल्पना खरातला दणका दिलाच; आता समोर उरला एकच 'ऑप्शन'

Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. तर दुसरीकडे अशोक खरात,त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीचा अन् जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Kalpana Kharat
Kalpana Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. तर दुसरीकडे अशोक खरात,त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीचा अन् जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे. तिच्यावतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मात्र, राहाता येथील न्यायालयात बुधवारी (ता.22 एप्रिल) कल्पना खरातला मोठा दणका दिला आहे.

राहाता कोर्टानं शिर्डी जमीन फसवणूक व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सव्वा तासांच्या युक्तिवादानंतर कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता फरार कल्पना खरातचा अटकेचा मार्ग पोलिसांसाठी मोकळा झाला आहे. त्यामुळे कल्पना खरातसमोर एकतर सरेंडर किंवा मग पोलिसांकडून अटक अशी दोनच पर्याय शिल्लक असणार आहे. पोलिसांना गुंगारा देत फरार झालेल्या कल्पना खरात हिने राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. याच जामीन अर्जावर राहाता न्यायालयात सुनावणी पार पडली.

अशोक खरातची पत्नी ही 31 मार्चपासून फरार असून पोलिसांनी तिला पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. एसआयटीच्या पथकानंही कल्पना खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी तिच्या मैत्रिणी, घरातील नोकर,कुटुंबाची चौकशी केली जात आहे. कल्पना खरात फरार होण्यापूर्वी कोणाच्या संपर्कात होती किंवा तिला कुठे आश्रय दिला जाऊ शकतो, या अनुषंगानं पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे.

कल्पना खरात हिने न्यायालयात घेतलेल्या या भूमिकेवरून बाल कथा 'वाल्या कोळी'च्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे.यावेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला.कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती अशोक खरात हे ऑपरेट करत होते,असा दावा केला आहे.त्यामुळे कल्पना खरातने देखील हातवर केले असून,सगळे आरोप अशोक खरातवर ढकलल्याचं दिसून येत आहे.

Kalpana Kharat
Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड, विजयसिंह मोहिते पाटलांनी CM फडणवीसांच्या भेटीसाठी गाठलं मंत्रालय, रणजितसिंहांना पुन्हा आमदारकी मिळणार?

आरोपीचे वकील म्हणाले, कल्पनाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, शिवसंकल्प हार्डवेअर हा व्यवसाय असून, कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते. कल्पना खरातच्या विरहित जमिनीचा व्यवहार झाला असून, त्यामध्ये आरोपी करू नये. कल्पना खरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. यानुसार कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मिळावा,अशी मागणी वकिलांनी केली आहे

कल्पना खरातचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले, तब्बल दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात याच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डी इथल्या गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का, या उद्देशाने शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. किरण सोनवणे याने वेळोवेळी अशोक खरात याला भेटून पैसे दिले. पण सर्व बैठकांमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती. तसंच कुठल्याही व्यवहाराला कल्पना खरात केव्हाच उपस्थित नव्हती, असे फिर्यादीनेच म्हटलं आहे."

Kalpana Kharat
Massajog Sarpanch Election: मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट; प्रतिस्पर्धी उमेदवाराचा गंभीर आरोप; धनंजय देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

अशोक खरातच कल्पनाचे खाते ऑपरेट करायचा तसंच कल्पना खरात हिचे सगळे सर्व बँक खाते तिचे पती कॅप्टन अशोक खरात हे ऑपरेट करायचा. फक्त पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही, अशोक खरात याने व्याजाची रक्कम मागितली आहे, कल्पना खरात हिने कधीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्याजाची रक्कम फिर्यादीला मागितली नाही, याकडे कल्पना खरातच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधलं.

तसेच या सुनावणीवेळी कल्पना खरातच्या वकिलानं 'वाल्या कोळी'च्या गोष्टीचा प्रत्यय कल्पना खरात हिच्या वकिलांच्या युक्तिवादानुसार सर्व प्रकरणाला अप्रत्यक्षरित्या अशोक खरात जबाबदार आहे. कल्पना खरातच्या या भूमिकेमुळे अशोक खरात हा एकटाच, सर्व कांडाला जबाबदार असल्याचे दिसते. कल्पना खरात हिच्या या भूमिकेमुळे अशोक खरात प्रकरणात खळबळ उडाली असून, वाल्या कोळीच्या गोष्टीचा प्रत्यय येऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com