Rahuri Bypoll Twist : प्राजक्त तनपुरेंचा यू-टर्न हा राजकीय शहाणपणा का?

After discussions with CM Devendra Fadnavis, Prajakt Tanpure skips nomination in Rahuri bypoll, giving BJP Akshay Kardile a major advantage : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न करून पुढची राजकीय पेरणी केल्याची चर्चा आहे.
Rahuri Bypoll Twist
Rahuri Bypoll TwistSarkarnama
Published on
Updated on

Rahuri Bypoll 2026 : खरंतर गेल्या महिना-दीड महिन्यापासून राहुरी मतदारसंघाचं वातावरण तापलं होतं. सोशल मीडियावर जी काही चर्चा रंगत होती किंवा जे अंदाज बांधले जात होते, ते सर्व अंदाज तनपुरे यांच्या बाजूचे होते. तनपुरे यांची बॉडी लँग्वेजही, मी या वेळेला जिंकणार अशीच होती. पण कुठे माशी शिंकली, माहीत नाही. त्यांनी चक्क निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली.

सन 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. ठाकरे-मुंडे-महाजन प्रस्थापित काँग्रेसजनांना धडा शिकवू लागले. पुढे 2014 मध्ये देशाचे राजकारणच पुरते बदलून गेले. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा पुढे आला.

केंद्राच्या पाठिंब्यावर फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाराष्ट्र जिंकण्याचा आणि सहकाराला सुरुंग लावण्याबरोबरच बलाढ्य नेत्यांची झोप उडवून दिली. त्यांचे भ्रष्टाचार वेशीला टांगले. साखर सम्राट तसे हुशार होते. त्यांनी काळाची पावले ओळखली. जर सहकार टिकवायचा असेल, तर सत्तेबरोबर जाण्यातच शहाणपण आहे, हे त्यांना माहीत होतं. आज अनेक साखर सम्राट भाजपच्या दावणीला बांधले आहेत.

त्यांना माहिती आहे, जर आपण भाजपच्या विरोधात बोललो, भूमिका घेतली, तर चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो. साखर कारखाना त्यांचा जीव की प्राण आहे. त्याचेच परिणाम गेल्या दहा-बारा वर्षांत दिसून येत आहेत. नगर असो सांगली, कोल्हापूर असो, सातारा असो किंवा नागपूर. येथे कमळ फुलले आहे. हे सर्व सांगण्याचे कारण असे की आज राहुरी (Rahuri) मतदारसंघाचे माजी आमदार आणि सहकारातले एक मोठे नाव, तनपुरे घराण्याचे वारसदार प्राजक्त तनपुरे यांनीही राहुरी विधानसभा पोटनिवडनुकीतून माघार घेतली.

Rahuri Bypoll Twist
NCP Crisis : तनपुरेंवर भरवसा नाही! शरद पवारांनी दिले दोन 'एबी फाॅर्म', दुसरा फाॅर्म ठाकरेंच्या शिलेदाराला...

लोकांना वाटत होते की, हा राष्ट्रवादीचा तरुण चेहरा मोठ्या ताकदीने भाजपविरुद्ध लढेल. विजयश्री खेचून आणेल. पण सगळे वेगळेच घडले. म्हणतात ना राजकारणात काहीही घडू शकते. तोच अनुभव आज पुन्हा राहुरी मतदारसंघाकडे पाहताना दिसून आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ही सगळी मंडळी सकाळी सकाळी तनपुरेंच्या जनसंपर्क कार्यालयात गेली. चर्चा केली. चर्चेनंतर तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले.

Rahuri Bypoll Twist
Rahuri Bypoll : प्राजक्त तनपुरे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी कर्डिलेंच्या प्रचारात उतरणार? भाजपच्या खेळीनं कार्यकर्ते अन् पदाधिकारी संभ्रमात!

खरेतर त्यांची माघार ही राजकीय शहाणपणा म्हणायचा का? महाराष्ट्रातील जे-जे भाजपचे विरोधक आहेत, त्यांना असे वाटत होते की, हा पोरगा भाजपच्या विरोधात मैदानात उतरेल. आवाज बुलंद करेल. पण तसे काहीच झाले नाही. येथे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विचार केला पाहिजे की मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. कोणता मतदारसंघ कसा असेल, कोण कोणाला जोडले जाईल, हे सांगता येत नाही.

भविष्याचा विचार

भविष्यात लोकसभेचा विचार केला, तर तनपुरे उमेदवार असू शकतात. मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांच्या झोळीत काहीतरी पडू शकते. आता निवडणुकीत माघार घेणे हे कसे फायद्याचे आहे, याचा विचार त्यांनी केला असावा. शिवाय मतदारसंघात जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतील. आज माघार घेण्यात त्यांनी जो शहाणपणा दाखवला आहे, तो त्यांच्या पथ्‍यावर पडण्याची अधिक शक्यता आहे. विधानपरिषदेचा शब्दही त्यांना मिळालेला असू शकतो. एकंदर आजच्या घडामोडीकडे कटाक्ष टाकला असता, असे दिसून येते.

सहानुभूतीची लाट

तिसरी गोष्ट महत्त्वाची आजपर्यंत एखाद्या नेत्यांच्या निधनानंतर मतदारसंघात त्यांच्याच नातेवाईकांना जर उमेदवारी दिली, तर तेथे सहानुभूतीची लाट येते. त्या नेत्याच्या घरातील कोणीही म्हणजेच ज्याला उमेदवारी देईल, तो निवडून येतो. जर तरचा जरी प्रश्न असला, तरी सहानुभूतीची लाट असतेच.

...तर कर्डिले आमदार असतील!

मुंबईमध्ये आमदार छोटू सावंत यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तिथे निवडणूक लढवली आणि त्यांचाही पराभव झाला होता, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. पण कोणी काही म्हणू, अक्षय कर्डिले लकी ठरले. ते आता राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आजपर्यंतचे सर्वाधिक तरुण आमदार असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com