Thackeray Brothers Morcha : ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाला नाशिकमधून बळ ; जिल्ह्यातील शिवसैनिक मुंबईत धडकणार

Thackeray Brothers joint morcha : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. मुंबईत मनसे व शिवसेना (उबाठा)चा संयुक्त मोर्चा असून ठाकरे बंधू या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
Raj thackeray uddhav thackeray
Raj thackeray uddhav thackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Thackeray Brothers Morcha Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीने उद्या, रविवारी (दि. ४) मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक येण्याची शक्यता आहे. या मोर्चासाठी मोठी तयारी सुरू असून नाशिकमधूनही या मोर्चाला बळ मिळणार आहे.

या मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांनी दिली. नाशिकमधील शिवसेना (उबाठाच्या) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. २) बैठक झाली. यावेळी गायकवाड यांनी मोर्चातील सहभागाबद्दल माहिती दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना आणि मनसेने संयुक्तपणे महामोर्चाची घोषणा केली आहे. या महामोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षातला जो कारभार आहे त्या विरोधात हा मोर्चा असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.

Raj thackeray uddhav thackeray
Nashik NMC Politics : नाराज राष्ट्रवादीला भाजप सत्तेत वाटा देणार, नाशिक महापालिकेच्या पाच विषय समित्यांचे वाटप निश्चिच

मुंबईत निघणाऱ्या या मोर्चासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. बैठकीला शिवसेना नाशिकचे निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हा सचिव नीलेश सांळुके, लोकसभा संघटक ऋषी वर्मा, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील तसेच महेश बडवे, शैलेश सूर्यवंशी, सुनील जाधव, राहुल दराडे, सचिन बांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Raj thackeray uddhav thackeray
Nashik NMC : नाशिकमध्ये मॉल, पेट्रोलपंप, हॉटेलमधील स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत ; महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे व्यावसायिक आस्थापनांना आवाहन

मोर्चाच्या मार्गात बदल

मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून आता 4 ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होण्याची शक्यता आहे. दहा वाजता या मोर्चाला जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा आगेकूच करत मुंबई महापालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. मुंबई महापालिकेसमोर सभेसाठी मंच उभारला जाणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते विविध पक्षांच्या नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत असून निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com