Rohit Pawar News : आता 'त्यांचा' विरोध करावाच लागेल; रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar In Nashik : कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांचा दौरा
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rohit Pawar On BJP And Ajit Pawar : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील बिनीच्या शिलेदारांनी बंडखोरांना साथ दिली. अजित पवार यांच्यासह राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या समर्थकांचा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. (Latest Political News)

Rohit Pawar
Ranjitsinh Mohite Patil Meet Ajit Pawar : सोलापुरातील मातब्बर नेते मोहिते पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार यांचा महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहता दौरा पुढे ढकलल्याचे मत होते. मात्र कार्यकर्ते आग्रहामुळे पवारांनी दौरा घेण्याचे निश्चित केले. आता पवारांच्या विचारांचे कार्यकर्ते एक आहे. सूक्ष्म नियोजन करून राज्यातील सभा प्रभावी होण्याची शक्यताही रोहित पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar
Ajit Pawar News : अजितदादा आग्रही असलेल्या खात्याबाबत लवकरच निर्णय होणार ?

यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली याचेही उत्तर दिले. तसेच हे कृत्य करणाऱ्यांविरोधात ताकदीने लढण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिली. रोहित पवार म्हणाले, "जे गेले त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवायचा नाही. पवार घराणे भाजपने फोडले आहे. त्यामुळे भाजपचा विरोध करावाच लागणार आहे. फुटीर काही बोलले तर जशास तसे उत्तर देऊ. आमच्या मताचे विभाजनाचा भाजपलाच फायदा होणार आहे. आता भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेल्या लोकांचा विरोध करणार आहोत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.