Rupali Chakankar : नाशिकमध्ये येताच रुपाली चाकणकरांचा ताफा अचानक राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या घरी वळला, SIT चौकशीपूर्वी नेमकं काय घडलं?

Rupali Chakankar visited late leader Ravindra Pagar’s residence : भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीने आज रुपाली चाकणकर यांची कसून चौकशी केली. चाकणकर सकाळीच त्यासाठी नाशिककडे रवाना झाल्या होत्या.
Rupali Chakankar paid tribute to late Ravindra Pagar’s portrait.
Rupali Chakankar paid tribute to late Ravindra Pagar’s portrait.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमधील अशोक खरात याच्या गैरव्यवहारांमध्ये कथित संबंध असल्याच्या आरोपांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर रविवारी (दि. १०) नाशिक येथे विशेष तपास पथकासमोर (SIT) चौकशीसाठी हजर झाल्या. त्यासाठी सकाळीच त्या पुण्याहुन नाशिकला निघाल्या होत्या. महिला लैंगिक शोषण व आर्थिक गैरव्यवहारांच्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या खरात प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली.

दरम्यान, नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर एसआयटीसमोर उपस्थित राहण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या ताफ्याने अचानक सिडकोकडे मार्ग बदलल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पांगरे मळा परिसरातील एका इमारतीसमोर ताफा थांबल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिवंगत जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पुत्र आकाश पगार यांनी चाकणकर यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या पगार कुटुंबीयांच्या निवासस्थानी गेल्या.

३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. ते सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. रुपाली चाकणकर यांनी दिवगंत नेते ॲड. रविंद्र पगार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पगार कुटुंबियांचे सांत्वन केले. चाकणकर यांनी यावेळी स्व. रविंद्र पगार यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. रुपालीताईंचे आमच्या घरी येणे हे अचानक ठरल्याची माहिती दिवंगत रवींद्र पगार यांचे पुत्र आकाश पगार यांनी माध्यमांना दिली.

Rupali Chakankar paid tribute to late Ravindra Pagar’s portrait.
Rupali Chakankar : नाशिकमध्ये रुपाली चाकणकरांची SIT कडून कसून चौकशी ; त्यापूर्वी माध्यमांचा गरडा अन् पहिली प्रतिक्रिया

पगार कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा ताफा महाराष्ट्र पोलीस अॅकडमी कडे वळला. चाकणकर यांना जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांची चौकशी करण्यात आली. तब्बल ६ तास चाकणकर यांची चौकशी करण्यात आली.

Rupali Chakankar paid tribute to late Ravindra Pagar’s portrait.
Rupali Chakankar : "हजर आहे सर..."; रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी रवाना होताच सुषमा अंधारेंनी डिवचलं

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरातविरोधात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या १२ गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. खरातशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदाचाही राजीनामा द्यावा लागला. चाकणकर या श्री ईशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या सदस्या होत्या. खरात या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. दोघांनी एकत्र धार्मिक विधी केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com