Bacchu Kadu : महादेव जानकरांनंतर बच्चू कडूंचाही भाजपवर गंभीर आरोप; तर दादा भुसेंकडून पाठराखण

Dadaji Bhuse and Bacchu Kadu : महादेव जानकर यांनी केलेल्या विधानाला बच्चू कडू यांनी पाठिंबा दिल्यानंतर भाजपवर टीका होत आहे. यावर आता दादा भुसे यांनी भाजपाची पाठराखण केली आहे.
Dadaji Bhuse and Bacchu Kadu
Dadaji Bhuse and Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: छोट्या पक्षाचा वापर करून भाजप त्यांना दूर करते, या बच्चू कडू यांच्या आरोपाबाबत उत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी भाजपची पाठराखण केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे सांगणाऱ्या भुसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचे ठणकावून सांगितले. (Dadaji Bhuse On Bacchu Kadu)

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी नुकतेच भाजपला टार्गेट केले. भाजप हा छोट्या पक्षांना वापरून सोडून देतो, असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याला बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे बच्चू कडू भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. भाजप मित्र पक्षांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान महादेव जानकरांनी केल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला. यानंतर भाजपवर टीकेची झोड उठत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dadaji Bhuse and Bacchu Kadu
Parbhani Lok Sabha Constituency : खासदार जाधवांना निष्ठा कामाला येणार की विरोधकांचे आरोप अडथळा ठरणार ?

याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांना विचारणा केली असता त्यांनी भाजपची पाठराखण केली. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. भाजप वापरून घेतो, असं काही नाही. पक्ष छोटा असो की मोठा, प्रत्येक पक्षाला तो वाढला पाहिजे, असे वाटते. त्याअनुषंगाने प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो, असे भुसे यांनी स्पष्ट करत एक प्रकारे भाजपची पाठराखण केली. दरम्यान, नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची असल्याचे दादा भुसे यांनी ठणकावून सांगितले.

'तुतारी'ला माझ्या शुभेच्छा...!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे नवीन चिन्ह मिळाले. या चिन्हाबाबत बोलताना भुसे म्हणाले, मी तुतारी चिन्ह मिळाल्याबाबत हार्दिक शुभेच्छा देतो. काल काहीजण फक्त तुतारी वाजवयाची अ‍ॅक्शन करीत होते. रेकॉर्डींग केलेला तुतारीचा आवाज स्पॉन्सर केला जात होता, अशी बोचरी टीका दादा भुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता यावेळी केली.

(Edited By-Ganesh Thombare)

Dadaji Bhuse and Bacchu Kadu
Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांची भाषा राजकीय, त्यांच्या मागे कोणीतरी...'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com