शिवसेना मालेगावात नव्या जोमाने उभी राहील!

मालेगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे.
Shivsena workers in Malegaon Meeting
Shivsena workers in Malegaon MeetingSarkarnama

मालेगाव : सत्तेच्या साठमारीत निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) बाजूला सारला गेला होता. शिवसेनेतील निष्ठावंतांचा वनवास संपला आहे. निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना नव्या जोमाने उभी राहणार, असा विश्‍वास व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नथु जगताप यांनी केले. (Loyal workers will have more respect in Shivsena)

Shivsena workers in Malegaon Meeting
नव्या सरकारमध्ये असणार खानदेशचे ५ मंत्री

मालेगाव कॅम्प शिवसेना पक्ष कार्यालयात श्री. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील शिवसेना बंडखोरांच्या निर्णयानंतर सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. त्यात पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Shivsena workers in Malegaon Meeting
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊतच जबाबदार

या बैठकीत कैलास तिसगे, नथु देसले, संयोग निकम, संजय बच्छाव, विष्णू पवार, नंदलाल वर्मा आदींची भाषणे झाली. बैठकीस विलास बिरारी, सुरेश पवार, पद्माकर पवार, परशराम देसले, नाना शेवाळे, योगेश पाटील, शरद देसले, शंकर पाटील, गणेश गायकवाड, दिलीप देशमुख, अनिल पवार, नाना शेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com