

Shrigonda MPSC aspirant death latest news : पोलिसात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात घडली.
मयुरी सुनील मखरे (रा. श्रीगोंदा) असे मृत युवतीचे नाव असून, या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयुरी ही सुनील मखरे यांच्या तीन मुलींपैकी सर्वांत लहान होती. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न झाले आहे. मयुरीला पोलिस उपनिरीक्षक (PSI) व्हायचे होते. यासाठी ती मेहनत घेत होती. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर तिने लक्ष केंद्रीत केले होते. यातून तिने MPSCची पूर्व परीक्षा उत्तीर्णही केली होती. आई-वडील श्रीगोंदा शहरापासून जवळच असलेल्या दत्तनगर भागात राहत होते. तरी अभ्यासाच्या सोयीसाठी मयुरी मैत्रिणींसोबत श्रीगोंदा शहरात भाड्याच्या खोलीत राहत होती.
रविवारी सकाळी मयुरीने मैत्रिणींसोबत नाश्ता केला. त्यानंतर तिच्या दोन मैत्रिणी अभ्यासिकेत निघून गेल्या. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यातील एक मैत्रीण काही कामानिमित्त पुन्हा खोलीवर परतली. तेव्हा खोलीचा दरवाजा आतूनन बंद होता. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने धावपळ करून दरवाजा उघडला; तेव्हा मयुरीने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मैत्रिणीला मोठा धक्का बसला.
घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ यांनी तातडीने सह कर्माचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. उमेश मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्रीगोंदा पोलिसांनी मयुरी हिच्या आकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी वेगवेगळ्या पातळीवर तपास सुरू केला आहे. मयुरीच्या संपर्कात असलेल्या मित्र-मैत्रिणींचा, नातेवाइकांची यात चौकशी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.