Rupali Chakankar ED Inquiry: रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ; SIT चौकशीनंतर आता EDची एन्ट्री

ED Enters After SIT Probe Rupali Chakankar News: SIT चौकशीनंतर आता ईडीनेही रूपाली चाकणकर प्रकरणात एन्ट्री केली असून आर्थिक व्यवहारांची चौकशी वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
Rupali Chakankar-Ashok Kharat
Rupali Chakankar-Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर( Rupali Chakankar) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ED) आता त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून लवकरच त्यांची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत साम टिव्हीने बातमी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच एसआयटीने (SIT) रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी केली होती.

या चौकशीत अनेक आर्थिक व्यवहार, काही संस्थांमधील सहभाग आणि पदाचा गैरवापर करून निधीची देवाणघेवाण झाली का, याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ईडीनेही या प्रकरणात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Rupali Chakankar-Ashok Kharat
Nida Khan News: निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या बायकोची नातेवाईक; संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ

विशेष म्हणजे, ‘शिवनिका’ संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही ईडीकडून तपासणी होणार आहे. या संस्थेमधील निधी, व्यवहारांचे स्वरूप, पैसे कुठून आले आणि कुठे वापरण्यात आले याचा बारकाईने तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यवहार संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Rupali Chakankar-Ashok Kharat
Chandrashekhar Bawankule News: आता फ्लॅटलाही मिळणार ‘सातबारा’सारखा पुरावा; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याच्यावर खंडणी रॅकेट चालवून ‘बेनामी’ बँक खात्यांच्या जाळ्यातून तब्बल 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवल्याचा गंभीर आरोप आहे. या पैशांचा वापर नेमका कुठे झाला, त्याचा कोणाला फायदा झाला आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता ईडी करणार आहे.

ईडीकडून पुढील काही दिवसांत चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com