

राजेंद्र त्रिमुखे
Karjat : एकीकडे शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करत राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात मोठी जाहीरात, लाखोंचा खर्च करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजेरी लावत आहेत. शासन आपल्या दारात येऊन आपली कामे करत असल्याचा संदेश दिला जात असला तरी इतरवेळी शासनाच्या विविध कार्यालयात नागरिकांना नानाविध अडचणींना रोजच्या रोज सामोरे जावे लागत आहे.
असाच काहीसा प्रकार कर्जत(Karjat) येथील भूमी अभिलेख कार्यालयात येत असल्याने आणि अनेकांच्या तक्रारी आल्या नंतर आज(18 ऑगस्ट) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब तनपुरे यांनी थेट तक्रारदार नागरिकांच्या उपस्थित कार्यालयाला टाळे ठोकले.
कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी हजर नसतात, लोकांची कामे पैसे घेतल्याशिवाय केली जात नाहीत, अनेकांना महिनोन महिने चकरा माराव्या लागत आहेत अशा अनेक तक्रारीला दाद दिली जात नाही. वरिष्ठही कुठलीही कारवाई करत नाहीत या सर्व प्रकाराला कंटाळून गुलाब तनपुरे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकले.(Latest Marathi News )
याबाबत माजी जि. प. सदस्य गुलाब तनपुरे(Gulab Tanpure) यांनी सांगितले, कर्जत येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाविरुद्ध सातत्याने अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असतात. येथील कर्मचारी लोकांची कामे वेळेवर करत नाहीत. वारस नोंद लावणे, शेत जमिनीची मोजणी करणे, मोजणीच्या तारखा योग्य पद्धतीने दिल्या जात नाहीत, चुकीच्या पद्धतीने कामे केली जात आहेत. पैसे देऊन ही कामे करत नाहीत, खासगी मोजणी लवकर केली जाते. मात्र, अधिकृत कामे केली जात नाहीत, अशा अनेक तक्रारी उपस्थित नागरिक करत होते.
यावेळी माजी जि. प. सदस्य गुलाब तनपुरे यांनी भूमी अभिलेखचे उप अधीक्षक अनंत पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी इंदलकर यांच्याबरोबर चर्चा केली, मात्र समाधान होऊ न शकल्याने शेवटी कार्यालयाला अधिकारी व कर्मचारी यांना आतमध्ये कोंडत कार्यालयाला टाळे ठोकले.
काहीवेळानंतर भूमी अभिलेखचे उपअधिक्षक अनंत पाटील यांनी एका महिन्यात सर्व कामे पूर्ण करू कोणतीही तक्रार येणार नाही याची विशेष काळजी घेऊ, कर्मचारी त्या त्या दिवशी कोठे गेले आहेत हे फलकावर लोकांना समजेल असे जाहीर करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विशाल म्हेत्रे, पांडुरंग सरकाळे, शहाजी शिंदे, अंकुश म्हेत्रे, शिवाजी गायकवाड यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.