Chhagan Bhujbal: कट्टर विरोधकाचं 'टायमिंग'; मंत्रिपद नाकारलेल्या भुजबळांना डिवचलं; म्हणाले,'पक्ष सोडून जाण्याची...'

Suhas Kande Open Challenge To Chhagan Bhujbal : राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर राजभवनात पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना डावलले गेल्याचे समोर आले आहे. या डावलल्या गेलेल्या नेत्यांमध्ये गेल्यात सर्वात मोठे नाव छगन भुजबळ यांचे होते.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ( Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं आहे. या निर्णयाविरोधात भुजबळांनी नागपूरचं हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडत थेट नाशिक गाठलं. तसेच त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बेधडक वक्तव्यांनी राजकारण तापवलं आहे. त्यांच्या निशाण्यावर ना भाजप, महायुती किंवा पक्षातील प्रफुल पटेल, सुनील तटकरेही नसल्याचे दिसून येत आहे.

मंत्रिपद डावलण्यावरुन त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवरच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शा‍ब्दिक हल्ले चढवणे सुरू ठेवले आहे.अशातच आता महायुतीतील भुजबळांचा कट्टर विरोधक मैदानात उतरला आहे. त्याने भुजबळ राजीनामा देऊच शकत नाही,त्यांच्यात पक्ष सोडण्याची हिंमतच नाही असं खुलं चॅलेंज दिलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे छगन भुजबळांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.त्यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोपांसह एकमेकांना आव्हान देण्याची भाषा दोन्ही नेत्यांकडून केली जाते. एकीकडे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असतानाच सुहास कांदेंनी त्यांना घेरलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Video : फडणवीसांच्या संकटमोचकाचे मोठे विधान, म्हणाले 'छगन भुजबळ यांची नाराजी परवडणार नाही'

आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी (ता.18) साम वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यात त्यांनी भुजबळांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,लोकसभेला त्यांनी विरोधात काम केलं, म्हणून नाशिकचे बीजेपीचे दोन्ही सीटस् पडले. माझी नाराजी नाही.मी राजकारणात राजकीय बोलतो. पण पक्षानं तुम्हांला सर्व इतकं दिलं असताना तरीही तुम्ही विरोधात काम करता.सर्वच मला पाहिजे, माझ्या मुलाला,पुतण्याला मिळालं पाहिजे.असं कसं चालेल ना.ओ बीसी फक्त तुम्ही तिघंच का, बाकी कुणी ओबीसीत शिल्लकच राहिले नाही का? असा खोचक सवालही कांदेंनी यावेळी केला.

कांदे म्हणाले, उलट मी महायुतीचे आभार मानेल की, ओबीसीतून तरुण चेहर्‍यांना संधी दिली. हे तरुण चेहरे महाराष्ट्राचा विकास करतील.भुजबळांमुळे पक्षाचं काहीही नुकसान होणार नाही,त्यांनी राजीनामा देऊनच दाखवावा.माझं त्यांना आव्हान आहे की, राजीनामा द्याच.पक्ष यापेक्षा जास्त पळेल, असं म्हणत भुजबळांना डिवचलं आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पुढची दिशा ठरवली ? म्हणाले, 'या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून छगन भुजबळांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे,यावरही आमदार कांदेंनी भाष्य केलं.ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा विरोधक आहे.त्यामुळे ते त्यांच्याजागी अगदी बरोबर आहे.भुजबळांनी खरंतर काँग्रेसमध्ये जावं.मी तर आव्हान देतो की,त्यांनी राजीनामा द्यावाच असंही कांदे म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर राजभवनात पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना डावलले गेल्याचे समोर आले आहे.या डावलल्या गेलेल्या नेत्यांमध्ये गेल्यात सर्वात मोठे नाव छगन भुजबळ यांचे होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत नाशिक येथे बुधवारी(ता.18) समता परिषदेचा मेळावा घेत ओबीसींचा एल्गार पुकारला आहे.

Chhagan Bhujbal
MLC Satej Patil : वारं फिरलं...! काँग्रेसच्या सतेज पाटलांसाठी विधान परिषदेची तिसरी टर्म 2014, 2021 इतकी सोपी नसणार...

छगन भजबळ म्हणाले, आपल्याला व्होकल मंत्री हवे, व्होकल नेते पाहिजे. जे आमच्यासाठी बोलतील. ही आपली लढाई आहे. परत आवाज द्यायला सुरुवात झाली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून सभागृहामध्ये लढणार आहे. तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असं सूचक विधान करत भुजबळ यांनी अजितदादांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

Chhagan Bhujbal
PM Narendra Modi : शहांच्या बचावासाठी पंतप्रधान मोदी सरसावले; आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादात उडी

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ म्हणाले, लोकसभेत मला नाशिक मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ते समजवणारही होते. परंतु तो निर्णय झाला नाही. त्यामुळे मी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेत मला पाठवणार असल्याचे सांगितले.

परंतु, लोकसभा निवडणुकीत सुनेत्राताई यांचा पराभव झाल्यामुळे राज्यसभेत त्यांना पाठवण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मी शांत राहिला. त्यानंतर साताऱ्याची जागा भाजपला हवी होती. त्यासाठी एक राज्यसभेची जागा ते राष्ट्रवादीला देणार होते. साताऱ्यासाठी नितीन पाटील इच्छुक होते. अजित पवार यांनी नितीन पाटील यांना सांगितले तुम्ही माघार घ्या. मी तुम्हाला खासदार करेन. परत नितीन पाटील यांचे नाव आले. खासदारकीची पोस्ट देताना चर्चा केली होती. मलाही शब्द दिला होता ना. जो न्याय त्याला दिला मला का नाही दिला? असा सवाल भुजबळ यांनी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com