Suhas Kande Strategy : आमदार सुहास कांदेंकडून जिल्हापरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची रणनिती, तालुकाध्यक्षांना नव्याकोऱ्या कार देणार

New Cars for Shiv Sena Taluka Presidents : आगामी जिल्हापरिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना तयारीला लागली आहे. आमदार सुहास कांदे यांनी त्यासाठी रणनिती आखली असून त्यांनी तालुकाध्यक्षांना मोटारी देण्याची योजना आखली आहे.
Suhas Kande Strategy
Suhas Kande Strategy Sarkarnama
Published on
Updated on

Suhas Kande's Strategy to Strengthen Shiv Sena in Nashik : नाशिक जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी नवी योजना आखली आहे.

शिवसेनेला विधानसभा निवडणुकीसह महापालिका निवडणुकीत मर्यादीत यश मिळालं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तर महापालिका निवडणुकीत भाजपने सरशी केली. मात्र, आता शिवसेनेने आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

आता जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून संघटन वाढीसाठी सर्वच तालुका प्रमुखांना नव्या कोऱ्या कार देण्यात येणार आहे. पक्षाचे नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी यासंदर्भात रणनीती आखली असून त्यांच्या पुढाकाराने या १३ मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत.

पक्ष घरोघर पोहोचविण्यासाठी तालुकाध्यक्षांवर जबाबदारी टाकण्यात येणार आहे. त्यांना दिलेली मोटार ही पक्षीय कार्यासाठीच वापरायची असून त्याचा दैनंदिन अहवाल घेण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष सदैव निवडणुकीसाठी सज्ज ठेवता येईल, अशी ही योजना असल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले आहे.

Suhas Kande Strategy
Nashik News : निधी वेळेत खर्च करा, नाहीतर विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

मोटारींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख चित्रे रंगावून शिवसेना आपल्या दारी लिहिण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या लंडनमध्ये असून ते परतल्यानंतर पुढील आठवड्यात या मोटारींचा लोकार्पण सोहोळा होणार आहे.

Suhas Kande Strategy
Ashok Uike : यापेक्षा गायीचा गोठा बरा, मंत्री अशोक उईके यांचे नाशिकमधील 'ती' आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश...

तालुकाध्यक्षांना मोटारी दिल्यानंतर पक्ष संघटन वाढवण्यासाठी घरोघर जाण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. विशेषतः आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गावोगाव फिरून तयारी करण्यात येणार आहे. यातून तालुकाध्यक्षांना पक्ष वाढीचे काम करण्यात मोठी मदत होईल. पक्षाच्या कामासाठी त्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com