नाशिक : गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून मुंबईत परतलेले शिवसेनेचे संपर्क नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवसेना भवनामधील पत्रकार परिषदेत शक्तिप्रदर्शन करताना श्री. राऊत यांच्यामागे भक्कम उभे असल्याची ग्वाही देण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आमदार, खासदार आज शिवसेना भवनमध्ये पोचणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. काही दिवसांपूर्वी खासदार राऊत यांनी सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’चे काही अधिकारी मला भेटले होते, असा दावा केला होता. त्यामुळेच माझ्या कुटुंबीयांवर ‘ईडी’कडून कारवाई होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ची पोलखोल करण्यासाठी श्री. राऊत मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित राहतील. श्री. राऊत उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते असल्याने त्यांच्यामागे उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार, महापालिका व जिल्हा परिषद सदस्यांची ताकद उभी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महविकास आघाडीतील नेत्यांना शिवसेना भवनात बोलाविण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे नाशिकचे सर्व स्थानिक नेते मुंबईत पोचणार आहेत.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.