Kalyan Congress Clash : कल्याणमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी चक्क काँग्रेस पक्षाचेच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कल्याण काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान घडला आहे. काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
आश्चर्याची बाबा म्हणजे कल्याण पूर्वेकडील कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या नाश्त्यावरून वाद झाला आणि त्यानंतर कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षांना कानशिलात लगावल्याचं सांगितलं जात आहे. कल्याण पूर्वेत शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
बैठकी दरम्यान नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे आणि शिवीगाळ केल्याचं सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या कुलकर्णी यांनी पातकर यांना गाठत भर बैठकीतच सर्वांसमोर त्यांना कानशिलात लगावली.
या घटनेमुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. शिवाय हा सगळा प्रकार बघून कार्यकर्ते देखील आश्चर्यचकीत झाले. दरम्यान, एका महिला नगरसेविकेबाबत जिल्हाध्यक्षांकडून अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचं कुलकर्णी यांचे समर्थक म्हणत आहेत.
तर या घटनेमुळे कल्याण काँग्रेसमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आल्याने पक्ष नेतृत्व यावर नेमका काय निर्णय घेणार आणि नगरसेविका कांचन कुलकर्णी की जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर नेमकी कोणावर कारवाई होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.