Nashik Teachers Constituency : आमदार किशोर दराडे यांच्या चौकशीची तत्परता शासन दाखवेल का? कोल्हेंचा सवाल

Nashik Teachers Constituency Election Politics Vivek Kolhe Demands Action Against Kishore Darade : शिक्षक मतदार संघातील राजकारण आता अधिक टोकदार होण्याची चिन्हे आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी याबाबत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे
Kishore Darade
Kishore DaradeSarkarnama
Published on
Updated on

Kolhe Vs Darade News : शिक्षक मतदार संघाची निवडणूक सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी याबाबत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता चांगल्याच रंग भरला आहे.

अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित शिक्षण शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांची राज्य शासनाचे यंत्रणांनी तपासणी केली. यामध्ये काय हाती लागले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अनुषंगाने अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ही चौकशी कोणाच्या सांगण्यावरून झाली हे मला माहित नाही. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अशी कारवाई होणे याला राजकीय वास येतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Kishore Darade
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंचा आरोपांचा 'अग्निबाण'; 'सरकारी पाहुण्यांनी आता 'त्यांच्या' गुन्ह्यांची...'

या संदर्भात विवेक कोल्हे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांना लक्ष्य केले आहे. आमदार दराडे यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आले आहेत. विविध आरोप आहेत, त्याबाबत देखील शासन तेवढ्याच तत्परतेने आणि पारदर्शकपणे चौकशी करेल का? अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवडणुकीत दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव टाकले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

Kishore Darade
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षकसाठी नगरमध्ये 20 केंद्र; चार तालुक्यात सर्वाधिक मतदार

आमदार (MLA) दराडे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या प्रतिज्ञापत्रात काही गुन्हे आणि कारवाई विषयीची माहिती जाणीवपूर्वक दडविण्यात आली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एका उमेदवाराने त्याबाबत हरकत देखील घेतली होती. त्यामुळे आमदार दराडे यांचा उमेदवारी अर्ज होल्ड करण्यात आला होता. ही हरकत फेटाळण्यात आली. मात्र त्याची चर्चा अद्याप सुरूच आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com