Dada Bhuse : धर्मेंद्र प्रधानांनंतर आता दादा भुसे टार्गेट ! युवक काँग्रेसचा 7 दिवसांचा अल्टिमेटम ; घरापासून आंदोलनाचा इशारा

Dada Bhuse Resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. युवक कॉंग्रेसने दादा भुसे यांना 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Dada-Bhuse
Dada-BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नीट (NEET) पेपर फुटीच्याविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) व हजारो विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असं आंदोलन पुकारलं. तब्बल ३६ दिवस चाललेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या तीव्र रेट्यापुढे अखेर मोदी सरकारला झुकावं लागलं.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला. सध्या भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी ही जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे.

Dada-Bhuse
Dada Bhuse : TET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी घेरलं ; भर बैठकीत दादा भुसे म्हणाले, मी स्वतःहून राजीनामा देईल..

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टीईटी पेपर फुटी प्रकरणात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.

युवक कॉंग्रेसने दादा भुसे यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत राजीनामा न दिल्यास त्यांच्या नाशिकमधील घरापासून आंदोलनाची सुरुवात करण्याचा इशारा युवक कॉंग्रेसने दिला आहे.

शिक्षणाचा अधिकार काढून केवळ माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला. यावर आमचा आक्षेप असून, येत्या सात दिवसांत दादा भुसे यांनी राजीनामा न दिल्यास महाराष्ट्रातील सर्व समविचार संघटनेसोबत आमचा संपर्क झाला असून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवक कॉंग्रेसने दिला आहे.

Dada-Bhuse
Photos: तुफान पावसात, विद्यार्थ्यांची तुफान गर्दी! संभाजीनगरमध्ये सर्वजण एकवटले; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन ठरणार निर्णयक?

महाराष्ट्रातील टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांच्या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवक कॉंग्रेसने केली आहे.

यापूर्वीही वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि युवक काँग्रेस यांसारख्या संघटनांनी त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने केली होती. मंत्री भुसे यांच्या मालेगावातील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन केले होते. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा युवक कॉंग्रेसने ही मागणी लावून धरली आहे. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच 'टीईटी' पेपरफुटी (TET Paper Leak) प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com