Shivsena Sinnar News : जनतेच्या मनामध्ये साचलाय मोदी सरकारविरोधात संताप!

There is a lots of anger in the minds of the people against Modi Government सिन्नरमध्ये शिवसेनेतर्फे गावोगावी सुरू आहे, मोदी सरकारविरोधात ‘होऊ द्या चर्चा’ जनसंवाद.
Shivsena leaders at Sinnar
Shivsena leaders at SinnarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena on Modi Geovernment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा...’, ‘मन की बात..’ खूप ऐकली. आता ‘जन की बात’ चालेल, असे सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सिन्नर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ या गटनिहाय बैठका सुरू आहेत. (Shivsena arrange a programme of lets have discussion in Sinnar constituency)

शिवसेनेतर्फे (Shivsena) (ठाकरे गट) सिन्नर (Sinnar) मतदारसंघात गावोगावी पंचायत समिती गटनिहाय राज्य (Maharashtra Government) व केंद्रातील सरकारच्या (Centre Government) जनविरोधी धोरणाबाबत नागरिकांशी चर्चा घडविली जात आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला.

Shivsena leaders at Sinnar
Manoj Jarange-Patil News : मनोज जरांगे यांची तोफ रविवारी नाशिकमध्ये धडाडणार!

या वेळी नागरिकांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शेतमालाला भाव मिळू नये, असे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यातीवर कर आकारला जातो. मात्र, खाद्यतेलापासून तर किती तरी वस्तू आयात करून त्यावर काहीही कर घेतला जात नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, शेंगदाणे, गडधान्याचे भाव निम्म्यावर आले. त्याला हमीभावदेखील मिळत नाही.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा बंद करण्यात आल्या. आश्वासन देऊनदेखील ईपीएफ ९५ योजनेतील कामगारांना अवघा हजार ते दीड हजार पेन्शन मिळते. युवकांना रोजगार न देता भाजपच्या एजन्सीज कमिशनवर कंत्राटी भरती करीत आहे. महागाई वाढवली व पगार कमी केले, गरिबांना देशोधडीला लावणारे हे सरकार असल्याने जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड असंतोष साचला आहे. येत्या निवडणुकीत तो व्यक्त होईल, असे या वेळी नागरिकांनी सांगितले.

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा स्थानिक पातळीवर झालेला परिणामदेखील या वेळी चर्चेत घेतला गेला. केंद्र सरकारने केलेला कामगार कायद्याचा फटका सिन्नर-मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केला कंपनीतील कामगारांना बसला असून, कायम कामगारांना कामावरून बाहेर कढल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. काही कामगारांनी बँकेतून कंपनीच्या नोकरीच्या भरवशावर कर्ज काढले. नोकरी गेल्यामुळे त्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असल्याचे नोकरी गेलेल्या एका कामगाराने सांगितले.

महागाई, बेरोजगारी, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, खासगीकरण, महिलांवरील अत्याचाार, सुधारित कामगार कायदा या धोरणाबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 'होऊ द्या चर्चा' या अभियानांतर्गत जनसंवाद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे धोरण मोदी व शिंदे सरकारचे असून, भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. अदानी आणि अंबानी यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत आहे. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येणार, काळे धन परत येणार, महागाई कमी होणार ही मोदींनी दाखविलेली स्वप्नं खोटी ठरल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.

Shivsena leaders at Sinnar
NDCC Bank News : ३४७ कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाने सहकारमंत्र्यांचे कान टोचले!

माजी आमदार राजाभाऊ वाजे, 'होऊ द्या चर्चा' अभियानाच्या नाशिक लोकसभा प्रमुख संगीता खोदाणा, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे, विधानसभा निरीक्षक पिराजी पवार, खरेदी-विक्री संघाचे संचालक विठ्ठल राजेभोसले, विनायक शेळके, पांगरी गटप्रमुख प्रकाश पांगारकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख बबन पोमनर, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण गडाख, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रशांत कुटे, गणेश वेलजाळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.

Shivsena leaders at Sinnar
Malegaon News : गटारीच्या निविदेत पुन्हा भ्रष्टाचाराची दुर्गंधी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com