

Nashik Police News: नाशिक पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतली आहे. गेले काही दिवस पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली. या अवैध वास्तव्य असलेल्या नागरिकांनी अन्य बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी सुरू आहे.
या दोघांनी बनावट कागदपत्र तयार करून गेली अनेक दिवस वास्तव्य केले होते .नाशिकच्या नवनाथ नगर भागातून त्यांना अटक करण्यात आली.
रोनी अब्दुल शेख (वय 32) या बनावट नावाने मोहम्मद मुशर्रफ हुसेन मुजीबुर रहमान खोकन हा बांगलादेशी नागरिक राहत होता. त्यासोबत अली बकर अन्सारी (वय 24) याचे मूळ नाव महंमद सज्जत हुसेन आशिक असे होते. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील पंचवटी भागातील नवनाथ नगर भागात ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे आणि विशाल देवरे यांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी पाळत ठेवून ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ आंचल मुद्गुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही झाली.
अटक केलेल्या या दोघांकडे बांगलादेशी राष्ट्रीय नागरिकत्वाचा दाखला तसेच पासपोर्ट आढळला आहे. त्यांनी पश्चिम बंगाल मार्गे गुजरातला येऊन एजंट मार्फत पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार केले होते. त्या आधारे कामासाठी नाशिकला राहात होते.
यासंदर्भात नाशिक शहर पोलिसांच्या 42 जणांच्या पथकांनी गेले काही दिवस पाळत ठेवून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचा अन्य बांगलादेशी नागरिकांची संपर्क आणि संबंध तपासला जात आहे. अन्य बांगलादेशी नागरिक देखील या निमित्ताने सापडण्याची शक्यता आहे.
नाशिक मध्ये अटक केलेल्या या दोघा बांगलादेशी नागरिकांचे गुजरात कनेक्शन उघड झाले आहे. गुजरातच्या एजंट मार्फत पहिल्यांदाच बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र देऊन भारतात वास्तव्य करण्यास मदत केल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दत्तात्रय कडनोर या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मदत घेण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.