Nashik Shiv Sena : उद्धव ठाकरेंना दिलासा, नाशिकच्या 15 नगरसेवकांनी घेतला एकनिष्ठ राजाभाऊंचा आदर्श, शिंदेंचा डाव फसला

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर अंतर्गत नगरसेवक गळाला लावले जात असल्याचे कथित प्रयत्न उद्धव ठाकरेंनी हाणून पाडले आहेत. त्यामुळे शिंदेंचा डाव फसल्याच्या चर्चा आहेत.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Nashik Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे १५ नगरसेवक आहे. यातील १२ नगरसेवक हे शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यादृष्टीने शिंदे गटाकडून या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी कथित हालचाली सुरु होत्या.

मात्र, या सर्व नगरसेवकांनी एकनिष्ठ राहिलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचाच आदर्श घेतला आहे. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या नाशिकमधील सर्व १५ नगरसेवकांना बुधवारी (दि. १५) मुंबईत मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं. त्यातील १५ पैकी १४ नगरसेवकांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला हजेरी लावली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंधरा पैकी सुमारे १२ नगरसेवक फुटणार व शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत एकनिष्ठतेची वज्रमूठ दाखविली.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरचं वादळ नाशिकमध्ये धडकताच उद्धव ठाकरे सावध, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला धाडलं

खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले, त्याप्रमाणे नगरसेवकांनीही फुटीच्या काळात गद्दारी न करता पक्षाशी प्रामाणिक राहिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा असा सल्ला दिला. यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही नगरसेवकांनी दिली. तसेच नाशिकच्या स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

दरम्यान या बैठकीत विकास निधीतील भेदभावाचा मुद्दा गाजला. महापालिकेत आपल्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक विकास निधी डावलला जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी मंजूर होत असताना, निवडून आलेल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना मात्र प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. हा मुद्दा ऐकून उद्धव ठाकरे आक्रमक झाले. विकासनिधी जनतेचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी या भेदभावाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा सल्ला नगरसेवकांना दिला. कायदेशीर लढाईत तुमचा विजय होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. परंतु निधीचा हाच मुद्दा कळीचा ठरु शकतो. यातूनच काही नगरसेवक फुटू शकतात अशी कुजबुज आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उद्धव ठाकरेंची धडधड पूर्णपणे थांबलेली नाही, हेही तितकच खरं आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तब्बल 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला? 5 कोटी...

बैठकीला हजर नगरसेवक

गटनेते केशव पोरजे यांच्यासह माजी उपमहापौर प्रथमेश गिते, योगेश भोर, वैशाली दळवी, माधुरी ढेमसे, रुचिरा साळवे, वैशाली दाणी, योगेश गाडेकर, शैलेश ढगे, भारती ताजनपुरे, संजीवनी हांडोरे, प्रमिला मैंद, सीमा पवार आणि मुरलीधर भामरे उपस्थित होते.

गैरहजर एक नगरसेवक कोण?

नगरसेविका मंगला आढाव या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांच्यावतीने त्यांचे पुत्र रोशन आढाव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com