Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील जळगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव,पारोळा, जामनेर, धरणगाव, यावल, बोदवड, पाचोरा व अमळनेर या बाजार समित्यांच्या संचालकपदासाठी आज (ता. २८) रोजी मतदान होत आहे. मतदान केंद्रावर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल २१६ जागासाठी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे. शनिवारी (ता.२९) ला सहा तर रविवार (दि..३०) रोजी सहा बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Jalgaon Agriculture Produce Market Committee) संचालकपदासाठी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एका मतदाराला १८ मतदान करण्याचा अधिकार आहे. सर्व बारा मतदार बाजार समितीत अठरा पदासाठी २१६ जागासाठी मतदान होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.
दिग्गजांच्या वर्चस्वाची कसोटी
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या वर्चस्वाची कसोटी आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर सहकार क्षेत्रातील ग्रामीण पातळीवरील या पहिल्याच निवडणुका(Election) होत आहे. बहुतांश बाजार समितीत शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस,राष्ट्रवादीप्रणित महाविकास आघाडी विरूध्द भाजप,शिवसेना शिंदे गट युतीची लढत आहे.
जळगाव बाजार समितीसाठीही तयारी
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागासाठी उद्या (ता. २८) मतदान होणार आहे. त्यासाठी जळगाव शहरात नूतनमराठा महाविद्यालयात तीन ठिकाणी बुध आहेत, तर कानळदा, सावखेडा, उमाळा, वावडदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी के.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान(Voting) केंद्रावर तयारी करण्यात आली आहे.
शनिवार,रविवारी मतमोजणी
बारा बाजार समित्यांच्या निवडणूकीची मतमोजणी एकाच दिवशी होणार नाही, तर सहा सहा बाजार समित्यांची मतमोजणी शनिवार व रविवार अशी दोन दिवस होणार आहे. शनिवार (ता.२९) रोजी भुसावळ,रावेर,चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर बाजार समित्यांची तर शनिवार (ता.३०) धरणगाव, यावल, बोदवड, पाचोरा, अमळनेर, जळगाव बाजार समित्यांच्या निवडणूकांची मतमोजणी होईल.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.