Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : नार्वेकरांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची सहीच नाही? 'मविआ'त खळबळ!

Ajit Pawar : अविश्वास प्रस्तावाबाबत ३९ आमदारांचं पत्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना दिले!
Published on

Ajit Pawar : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे सुरू आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे, वादळी ठरत आहे. अशी स्थिती असतानाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाआघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीकडून आता अध्यक्ष नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याविरोधात अविश्वासचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या अविश्वास प्रस्तावाच्या पत्रावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांचीच सही नसल्याची माहिती मिळत आहे.

अविश्वास प्रस्तावाबाबत ३९ आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं. आमदारांना अधिवेशनामध्ये बोलू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार, शिवसेनेचे नेते सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे. मात्र आता या पत्रावर अजित पवार यांचीच सही नसल्याचे समजते आहे.

Ajit Pawar
Rahul Narvekar : मोठी बातमी! सहा महिन्याच्या आत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर विरोधकांचा अविश्वास ठराव

दरम्यान, या प्रस्तावाबाबत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. तर हे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरलं आहे. या अधिवेशनामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, शिंदे गटातील मंत्र्यावरील झालेले आरोप, आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप अशा अनेक मुद्यांनी हे अधिवेशन गाजलं.

Ajit Pawar
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com