NCP Nagpur Declaration : अजित पवारांचे 'नागपूर डिक्लेरेशन', भाजपविषयीची भूमिका केली जाहीर!

Ajit Pawar NCP BJP : नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकदिवशीय चिंतन शिबिरात अजित पवारांनी नागपूर डिक्लेरेशन मांडले. यात भाजपसोबतच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
Ajit Pawar expressed support for the Nagpur Declaration, confirming that his party will further strengthen its alliance with the BJP in Maharashtra. Get the full political update here.
Ajit Pawar expressed support for the Nagpur Declaration, confirming that his party will further strengthen its alliance with the BJP in Maharashtra. Get the full political update here.sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र वाटचाल आणि विकासाचा रोडमॅप जाहीर करतानाच नागपूरमधील चिंतन शिबारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘नागपूर डिक्लेरेशन' जाहीर केले. यामध्ये भाजपसोबतच्या युतीबाबतची भूमिका त्यांनी जाहीर केली.

भाजपसोबत युती मजबूत करण्यात येणार असल्याचे ‘नागपूर डिक्लेरेशन'मध्ये सांगण्यात आले. विकासाचा रोडमॅप मांडून पक्षाची भविष्याची वाटचाल कशी राहील, देखील अजित पवार यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या नेतृत्वात 10 समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीमध्ये 30 ते 40 जणांचा समावेश करून त्यांना वेगवेगळे विषय वाटून देण्यात आले होते. त्यांच्याकडून नव्या योजना, धाडसी कल्पना, पक्षाचे धोरण, पक्षाची वाटचाल यावर लेखी मत मागवण्यात आले. ते सर्व एकत्रित करून अजित पवार यांनी 'नागपूर डिक्लेरेशन' या नावाने पक्षाचे आगामी धोरण जाहीर केले.

अजित पवार यांनी आपल्या समारोपीय भाषणात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, कर्जाची टक्केवारी, निधी वळवल्याचा विरोधकांमार्फत होत असलेले आरोपांचा समाचार घेतला. राजकारण यशस्वी होण्यासाठी अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मंत्रही सांगितला. महत्त्वाकांक्षा ठेवा, बदलाशी जुळवून घ्या, जबाबदारी घ्या सोबतच संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्त ठेवा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Ajit Pawar expressed support for the Nagpur Declaration, confirming that his party will further strengthen its alliance with the BJP in Maharashtra. Get the full political update here.
Chhagan Bhujbal Beed OBC meeting : भुजबळ बीडमध्ये येत जरांगेंना भिडणार; तारीख ठरली, सरकारकडे करणार प्रमुख दोन मागण्या

प्रवक्त्यांना कनपिचक्या

वादग्स्त वक्तव्य करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. यापुढे बोलताना संयम बाळगा, शब्द जपून वापरा, महायुतीत मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला.

Ajit Pawar expressed support for the Nagpur Declaration, confirming that his party will further strengthen its alliance with the BJP in Maharashtra. Get the full political update here.
Maharashtra Politics : 'संजय राऊत हा राहुल गांधीनी पाळलेला डाॅग', गोपीचंद पडळकरांच्यानंतर शिंदेंच्या शिलेदाराची जीभ घसरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com