Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचं एन्काऊंटर भाजपच्या सांगण्यावरूनच; माजी गृहमंत्र्यांनी बॉम्ब टाकला

BJP Involvement in Encounter : बदलापूरच्या शाळेतील अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतरही ते उघडकीस आले. शाळेत साफसफाई करणाऱ्या अक्षय शिंदेला आरोपी बनवण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.
Akshay Shinde funeral
Akshay Shinde funeral sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती भाजपशी संबधित होती. त्यांना वाचवण्यासाठी बलात्काराचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काऊंटर करण्यात आल्याचा खळबळनजक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आरोपी शिंदेने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या नाही तर त्याला पोलिसांनी मारले, हे आपण आधीच सांगितले होते, असा दावाही देशमुख यांनी केला.

बदलापूरच्या शाळेतील अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतरही ते उघडकीस आले. शाळेत साफसफाई करणाऱ्या अक्षय शिंदेला आरोपी बनवण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या दरम्यान शाळेच्या संचालकावरही संशय व्यक्त केला जात होता. आता न्यायदंडाधिकारी यांनी शिंदे यांने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या हे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते, असा निष्कर्ष देण्यात आल्याने पुन्हा हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Akshay Shinde funeral
Narendra Modi: PM मोदींच्या कानमंत्रांनंतरही 'स्थानिक'साठी राष्ट्रवादी, भाजपमधील काही नेत्यांनी आळवला स्वबळाचा सूर

अनिल देशमुखांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे. ज्या शाळेत चिमुलकीचे लैंगिक शोषण झाले ती शाळा भाजपच्या (BJP) मंडळींची होती. त्यांना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर करायला लावला काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चिमुकलीवर अत्याचार अक्षय शिंदे यानेच केला अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याला अटकेनंतर पोलिसांनी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यांनी पोलिसाचे रिवॉल्व्हर हिसकावून स्वतः गोळी झाडून मारून घेतले होत. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी आपल्याला संशय आला होता. तो बोलूनसुद्धा दाखवला होता.

Akshay Shinde funeral
Shivsena VS Congress : वडेट्टीवारसाहेब, आपला पक्ष कसा संपला ते आधी बघा : शिवसेनेचा पलटवार

पोलिसांच्याजवळ असलेले रिवॉल्व्हर काढून कोणी गोळ्या झाडू शकत नाही. ते लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आपण केली होती. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिकाऱ्याच्या निष्कर्षावरून दिसते, असेही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले.

Akshay Shinde funeral
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा राजीनामाच 'राष्ट्रवादी' अन् त्यांच्या हिताचा!

अक्षय शिंदेने ज्या बंदुकीने स्वतःला मारून घेतले, त्यावर त्याचे फिंगरप्रिंट नव्हते. हा एन्काऊंटर कोणी केला? कोणाला सांगून केला? कोणाला वाचवण्यासाठी केला? हासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, असे सांगून देशमुखांनी याविरोधात आणखी आवाज बुलंद करण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. या प्रकरणावरून आता महायुती सरकारला विरोधकांमार्फत घेरण्याची शक्यता आहे. हे प्रकरण घडले तेव्हा राज्यात महायुतीचेच सरकार होते.

Akshay Shinde funeral
Dhananjay Munde News : अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात..! धनंजय मुंडेंना सतावतेय ‘ही’ भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com