Sahar Sheikh News: 'कैसे हराया..' फेम MIM नगरसेविकेचे पद जाणार; तहसीलदारांकडून मोठी कारवाई

MIM Corporator Sahar Sheikh Faces Disqualification: MIMच्या नगरसेविका सहर शेख यांचे पद जाणार असून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Sahar Sheikh News
Sahar Sheikh NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MIM News: महापालिका निवडणूक निकालानंतर राज्यात चर्चेत आलेली युवा नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ⁠⁠ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे.

सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस उमेश पाटील यांनी आपल्या अहवालात केली आहे. उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जातपतडताळणी समितीकडे शिफारस केली.

सहरच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार सिद्दीकी अहमद यांनी केली होती.सहर हिच्याविरोधात ⁠सिद्दीकी अहमद यांनी तक्रार केली होती. त्यावर चौकशी करण्यात आली. त्यात सहर दोषी असल्याचे आढळले आहे. आता सहरचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sahar Sheikh News
Santosh Bangar News: मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, फोनही उचलत नाहीत; त्यांना घरी बसवा! शिंदेंसमोरच बांगर यांची डरकाळी..

या प्रकरणाची चौकशी ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी केली. उमेश पाटील यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. जातपडताळणी विभाग, निवडणूक विभाग आणि ठाणे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय यांची फसवणूक केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एमआयएमची नगरसेविका सहर शेख ही मुळची उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. ⁠

Sahar Sheikh News
MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

'कैसे हराया..'

नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या जल्लोष साजरा करताना आपल्या भाषणावेळी 'कैसे हराया..' असे मिश्किलपणे सहर भाषणात म्हणाली होती. तिचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com