Amravati Crime : नगराध्यक्षांची मुलगी अन् जावयाकडून १ कोटी १२ लाखांची फसवणूक; स्वस्त सोन्याच्या आमिषाने व्यापाऱ्यांना गंडा

Amravati gold fraud case : अमरावतीमध्ये स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांची १ कोटी १२ लाख रुपयांची कथित फसवणूक करण्यात आली. नगराध्यक्षांच्या मुलगी आणि जावयावर काय आरोप आहेत? जाणून घ्या सविस्तर.
Amravati Crime : नगराध्यक्षांची मुलगी अन् जावयाकडून १ कोटी १२ लाखांची फसवणूक; स्वस्त सोन्याच्या आमिषाने व्यापाऱ्यांना गंडा
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

अमरावती : स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या जावयाने व्यापाऱ्यांना सोन्याच्या लिलावातून कमी किमतीत सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून स्वप्निल ऊर्फ मोन्टू अनिल भुईभार याला अटक केली आहे. या गुन्ह्यात त्याची आई आणि पत्नी म्हणजेच भारसाकळे दाम्पत्याच्या मुलीचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.

सोन्याच्या लिलावातून मोठ्या नफ्याचे आमिष

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल भुईभार याने व्यापारी विक्रम गुप्ता, जयेश गुप्ता, शिला गुप्ता आणि आयुषी गुप्ता यांना मुथूट फिनकॉर्प आणि सीएसबी बँकेच्या सोन्याच्या लिलावाची माहिती दिली होती. या लिलावातून बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने मिळवून देऊ आणि त्यातून मोठा नफा मिळवता येईल, असे आमिष त्याने दाखवले.

Amravati Crime : नगराध्यक्षांची मुलगी अन् जावयाकडून १ कोटी १२ लाखांची फसवणूक; स्वस्त सोन्याच्या आमिषाने व्यापाऱ्यांना गंडा
ST Bus NCMC Smart Card Update : महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! NCMC कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ; पाहा नवीन डेडलाईन

या आमिषाला बळी पडून संबंधित व्यापाऱ्यांनी आरोपीकडे पैसे दिले. आरोपीने त्यांच्याकडून एकूण १ कोटी ४८ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. त्यातील काही रक्कम परत करण्यात आली. मात्र, उर्वरित रक्कम आणि २९७ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याच्या व्यवहारातून व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

पिंपरी-चिंचवडमधून आरोपीला अटक

या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी स्वप्निल ऊर्फ मोन्टू अनिल भुईभार याला पिंपरी-चिंचवड येथून अटक केली. या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपीची आई आणि पत्नी यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघींची भूमिका काय होती, तसेच फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा व्यवहार कुठे झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.