

Amravati District Bank: अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विभागीय सहनिबंधकांकडून सोमवारी (ता. २१) अस्थायी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट ११०५ सदस्यांच्या संदर्भात विरोधी संचालकांनी विरोध दर्शविला असून येत्या दोन दिवसांत याविरोधात हरकत नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी सुरवातीपासनूच ही प्रक्रिया वादात अडकली आहे.
२८२५ या यादीमध्ये १४ तालुक्यांतील सभासदांचा समावेश आहे. सोमवारी (ता. २१) प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यादीत समाविष्ट ११०५ सभासदांविरोधात आम्ही हरकती घेणार असल्याचे विरोधी संचालक रवींद्र गायगोले यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा कार्यकाळ चार ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर होईपर्यंत आम्हालाच कार्यवाहक म्हणून कायम ठेवण्याची मागणी केली असून त्यावर मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाच्या मंबई खंडपीठात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
मंगळवारी होणाऱ्या सुनावणीनंतर जिल्हा बँकेवर विद्यमान संचालक मंडळच प्रभारी म्हणून कार्यरत राहणार की प्रशासकांची नियुक्ती होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा न्यायालयीन निर्णयाकडे लागल्या आहेत.
तालुका - सभासद
अचलपूर- ३२९ दर्यापूर- २८२ चांदूरबाजार- ३७८ नांदगाव खंडेश्वर- १७१
अमरावती- ७०७ धामणगावरेल्वे- ७२ चांदूररेल्वे- ५० तिवसा- ८२
अंजनगावसुर्जी- १८७ धारणी- २८ चिखलदरा- २४ वरुड- २२६
भातकुली- ६४ मोर्शी - २२५
एकूण - २८२५
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.